लोकसत्ता टीम
नागपूर: राज्यात गेल्या दोन आठवड्यापासून पावसाने धुमाकूळ घातला असताना विदर्भात देखील मुसळधार पावसाने ठाण मांडले आहे. आज पुन्हा एकदा विदर्भाला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली येथे पूरस्थिती उद्भवल्यानंतर आता पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. आज गुरुवार, २७ जुलैला गडचिरोली व चंद्रपूरला ‘रेड अलर्ट’ देण्यात आला असून नागपूरसह अन्य काही जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. गुरुवारी नागपूरसह भंडारा, गोंदिया व यवतमाळ या जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला असून प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आणखी वाचा-रेड अलर्ट! वर्धा जिल्ह्यात मुसळधार, शाळांना सुट्टी, लोकांचे स्थलांतर, वीजबळी
गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’ देण्यात आला असून प्रशसनाला पूर परिस्थितीच्या दृष्टिकोनातून सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याखेरीज अन्य जिल्ह्यांनासुद्धा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. विदर्भात शुक्रवारपर्यंत सर्वदूर चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. त्यानंतर रविवारपर्यंतसुद्धा बहुतांश ठिकाणी दमदार पावसाची शक्यता आहे. पुढे सोमवारपासून पावसाचा जोर काहीसा मंदावेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.