नागपूर : पावसाने यंदा देशभरातील अनेक राज्यांत दीर्घ कालावधीपर्यंत दडी मारली. त्यामुळे ऑगस्ट उलटूनही वातावरणातील उकाडा कायम आहे. आता महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये सात सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंदमान आणि निकोबार बेटे, ओडिशा, तेलंगणा, किनारी आंध्र प्रदेशच्या काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर छत्तीसगड, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळच्या काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

हेही वाचा – भारतीय तत्त्व अभ्यासक्रमात समाविष्ट केल्याने पुरोगामींच्या पोटात का दुखते? डॉ. सतीश चाफलेंचा सवाल, तर भाजपामुळे शिक्षण संस्कृती नष्ट झाल्याचा डॉ. मुनघाटेंचा आरोप

कर्नाटक, कोकण, गोवा, रायलसीमा, पुडुचेरी, कराईकल इथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर द्वीपकल्पीय भारत, ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये येत्या पाच दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

६ सप्टेंबर रोजी पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, गोवा, तेलंगणा, तमिळनाडू, केरळच्या काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे, कर्नाटक, किनारी आंध्र प्रदेश, यानाम, पुडुचेरी, कराईकल आणि माहे येथे पावसाची शक्यता आहे.

हेही वाचा – आकाशी झेप घे रे पाखरा! नागपूर ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्रातील उपचारानंतर ‘ती’ दोन गिधाडे…

दुसरीकडे, ५ सप्टेंबरला छत्तीसगड, ओडिशा, तेलंगणाच्या काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच मराठवाडा, विदर्भ, कोकण, गोवा, पुडुचेरी, कराईकल आणि माहे येथेही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ७ सप्टेंबरला ओडिशाच्या काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, गोव्याच्या काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याच दिवशी तेलंगणा, तमिळनाडू, केरळ, किनारपट्टी आणि दक्षिणअंतर्गत कर्नाटक, आंध्र प्रदेश, पुडुचेरी, कराईकल आणि माहे येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rain will fall in maharashtra till september 7 rgc 76 ssb
Show comments