नागपूर : उपराजधानी गेल्याच आठवड्यात तापमान ४३ अंश सेल्सिअसवर पोहचले असताना आज मात्र अचानक वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाने उपराजधानीला झोडपले. ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली आणि अवघ्या तासाभरातच उपराजधानी ओलिचिंब झाली. हा पाऊस दुपारपर्यंत कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> भंडारा : बडा बाजार येथील बिसेन हॉटेलला भीषण आग

मागील आठवडा पूर्णपणे उष्णतेच्या लाटेत गेल्यानंतर या आठवड्याची सुरुवात मात्र अवकाळी पावसाने झाली. मंगळवारी दुपारच्या सुमारास देखील शहरात गारपिटीसह पाऊस झाला. सोबतच वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या, झाडे उन्मळून पडली. तर आज मात्र सकाळपासूनच आकाशात ढगांची गर्दी झाली आणि नऊ वाजताच्या सुमारास शहर पूर्णपणे काळवंडले. त्यानंतर ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वाऱ्यांचा वेगही अधिक होता.

हेही वाचा >>> नागपूर विभागातील अवयव प्रत्यारोपणाची विक्रमाकडे वाटचाल

वादळीवाऱ्यांसह आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे तासाभरातच संपूर्ण शहर जलमय झाले. हा पाऊस दुपारपर्यंत कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे फळबाग आणि शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान हवामान खात्याकडून पुन्हा एकदा राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता.  खात्याच्या अंदाजानुसार या काळात वाऱ्याचा वेग प्रति तास ३० ते ४० किलोमीटर इतका राहणार आहे. राज्यात हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rain with stormy winds in nagpur rgc 76 zws