लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे रेल्वेवर परिणाम झाला आहे. पश्चिम रेल्वेच्या वडोदरा विभागातून धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या तर काही गाड्यांना विलंब होत आहे.

आधीच पावसामुळे विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक गुजरातच्या दाहोद जिल्ह्यात एक मालगाडी घसरल्याने पुन्हा प्रभावित झाली. त्यामुळे ३० तासांपासून रेल्वेमार्गावर वाहतूक बंद होती. परिणामी, ३९ रेल्वेगाड्या रद्द कराव्या लागल्या. ५८ रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलण्यात आले. पश्चिम रेल्वेने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, बहुतांश स्थानिक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात नागपूर मार्गे धावणारी अहमदाबाद-हावडा एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील रतलामहून वडोदराकडे जणाऱ्या मालगाडीचे १६ डबे सोमवारी रात्री दाहोदजवळील महुडी आणि लिमखेडा स्थानकादरम्यान घसरले.

आणखी वाचा-बँक घोटाळा प्रकरणात नवीन घडामोड… सुनील केदार यांची आता मौखिक सुनावणी…

पश्चिम रेल्वेच्या निवेदनानुसार, मंगळवारी सकाळी ३९ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ५८ एक्सप्रेस गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहे. रद्द केलेल्या गाड्यांमध्ये सोमवारी दाहोद, वडोदरा, मुंबई, जयपुर, इंदूर, अहमदाबाद, गांधीनगर आणि पटना येथून निघून मंगळवार, बुधवार आणि गुरूवारी पोहचणार होती. याशिवाय ५८ एक्सप्रेस गाड्यांना रतलाम, सूरत, वडोदरा, भेस्तान (सूरतजवळ), छायापुरी (वडोदराजवळ), नागदा आणि भोपाळ स्थानक मार्गे वळवण्यात आले आहे.

गुजरातच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. अनेक गावे जलमय झाल्याने व रस्ते पाण्याखाली गेल्याने तेथील संपर्क तुटला आहे. येथे अडकलेल्या पूरग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाकडून (एसडीआरएफ) दिवस-रात्र मदतकार्य सुरू आहे. सध्या जामनगर हा सर्वात जास्त प्रभावित जिल्ह्यांपैकी एक आहे. गेल्या २४ तासांत राज्यात सरासरी ३२ मिमी पाऊस झाला. रविवारी पूरस्थिती अतिशय भयंकर होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. आता पूरस्थिती थोडा सुधारली आहे. मात्र, पुराचा फटका रस्ता, रेल्वे वाहतुकीला बसला आहे. त्यात मालगाडी घसरल्याने रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम दिसून आला आहे.

आणखी वाचा-मानसिक तणावातून आत्महत्येचा प्रयत्न गुन्हा नाही…

पश्चिम रेल्वेच्या वडोदरा विभागात मुसळधार पाऊल पडला. या विभागातील बाजवा रेल्वे स्थानकावर पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे बाजवा मार्गे धावणाऱ्या काही गाड्या रद्द तर काही गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला. १२८३३ अहमदाबाद-हावडा (नागपूर मार्गे) एक्सप्रेस २७ ऑगस्टला रद्द करण्यात आली, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या प्रसिद्ध पत्रकात देण्यात आली आहे.