नागपूर : Maharashtra Weather Forecast देशभरासह राज्यातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असली तरीही अद्याप राज्यांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. हवामान खात्याने येत्या २४ तासांमध्ये राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. कोकण किनारपट्टीसह इतर भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
ठाणे, मुंबई उपनगरासह राज्यात आजही पावसाची शक्यता आहे. राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण दिसून येईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील २४ अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर राज्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
हेही वाचा >>> “निवडणुका लढणार नाही, पण…”, योगेंद्र यादव यांनी स्पष्ट केली भूमिका
चार ऑक्टोबरपर्यंत बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या विविध भागात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाच ऑक्टोबरनंतर आकाश अंशतः ढगाळ राहून हवामान कोरडे राहील. त्यामुळे, पावसाची शक्यता कमी असणार आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ऑक्टोबर महिन्यात मात्र कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या महिन्यात राज्यातून मान्सूनच्या परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे.