नागपूर : परिवहन खात्याने राज्यभऱ्यातील विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या ‘हेल्मेट सक्ती’साठी नवीन क्लृप्ती शोधली आहे. त्यानुसार दुचाकीने विना हेल्मेट महाविद्यालयात आलेला विद्यार्थी आणि शासकीय कार्यालयात आलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थी व शासकीय कर्मचारी, नागरिकांमध्ये हेल्मेटबाबत जनजागृतीसाठी परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी नवीन योजना आखली आहे.

Supreme Court on bulldozer action (1)
अतिक्रमणविरोधी कारवाईवेळी ‘हे’ नियम पाळा, थेट सर्वोच्च न्यायालयानंच घालून दिली नियमावली!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त
Heavy police presence on the occasion of Prime Minister narendra modis visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त कडक पोलीस बंदोबस्त
police conduct mock drill ahead of pm modi pune tour for Maharashtra Assembly Election 2024
बंदोबस्ताची रंगीत तालीम; मध्यभागात वाहतूक कोंडी
Municipal corporation Thane, illegal hoarding holders Thane, illegal hoarding Thane,
ठाण्यात ५२ बेकायदा होर्डिंगधारकांना पालिकेच्या नोटीसा, १० कोटी ९६ लाखांचा दंड पालिका करणार वसूल
TET, AI, TET malpractices, TET news, TET latest news,
‘टीईटी’वर आता एआय ठेवणार नजर… गैरप्रकार रोखण्यासाठीच्या उपाययोजना काय?
bombay high court slams bmc officer over cm order
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला महत्व नाही का? उच्च न्यायालयाची महापालिका प्रशासानाला विचारणा

हेही वाचा – रेल्वेचे ‘झिरो स्क्रॅप मिशन’ यशस्वी, भंगार विक्रीतून कोट्यवधींचा लाभ

या योजनेची अंमलबजावणी सुमारे आठवड्याभरात सुरू होईल. त्यानुसार राज्यभऱ्यातील प्रादेशिक परिवहन अधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्वाधिक नागरिकांची ये-जा असलेल्या शासकीय कार्यालयांसह महाविद्यालयांची माहिती गोळा करायची आहे. या महाविद्यालय व शासकीय कार्यालय प्रमुखांना तेथे दुचाकीवर येणाऱ्या वाहनधारकांना हेल्मेटशिवाय प्रवेश न देण्याची सूचना करायची आहे. त्यानंतर येथे आरटीओकडून कारवाई सुरू केली जाईल. तरीही चित्र बदलले नाही तर आरटीओकडून तेथील कार्यालय प्रमुखांवरही मोटार वाहन कायद्यातील १९४ कलमानुसार कारवाई केली जाणार असल्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.

हेही वाचा – वाशीमचे सुपुत्र अमोल गोरे यांना वीरमरण, दोन सहकाऱ्यांना वाचवले

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत

स्थानिक आरटीओ अधिकाऱ्यांना संबंधित कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेण्याची सूचना परिवहन आयुक्तांनी केली आहे. त्यानुसार प्रत्येक सात दिवसांत एकदा आरटीओ अधिकारी गर्दी असलेल्या भागातील महाविद्यालय, शासकीय कार्यालयांच्या सीसीटीव्हीची पडताळणी करतील. त्यात हेल्मेट नसलेल्या वाहनांवर कारवाई केली जाईल. तरीही सुधारणा होत नसल्यास त्याच्या तेथील संस्था प्रमुखांवरही कारवाई केली जाईल. या वृत्ताला परिवहन आयुक्तांनी दुजोरा दिला.