लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर: केंद्र सरकारच्या सूचनेवरून नागपुरात रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत गुरूवारी आरटीओतील महिला अधिकाऱ्यांनी मोटार सायकल रॅली काढली. याप्रसंगी दिलेल्या जनजागृतीपर घोषणांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

नागपूर शहर प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय या कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ही रॅली होती. नागपूरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गिते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (पूर्व नागपूर) रवींद्र भुयार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (नागपूर ग्रामीण) राजेश सरक यांनी रॅलीलख हिरवी झेंडी दाखवली

हेल्मेट बाईक रॅली प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नागपूर (शहर) – प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नागपूर (ग्रामीण), उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नागपूर (पूर्व) प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर (शहर) यांना जोडणाऱ्या रस्त्यावर फिरली.

आणखी वाचा-मृत कंत्राटी वीज कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना आता चार लाख; ऊर्जामंत्री फडणवीसांच्या सूचनेवरून तरतूद

रॅली दरम्यान आरटीओतील महिला अधिकाऱ्यांनी “सडक सुरक्षा, जीवन रक्षा, सर सलामत तो पगडी पचास, दुर्घटना पर लगेगा ताला जब पहनोगे सुरक्षाकी माला, शौक शोक संदेशमे ना बदल जाए उससे पहले हेल्मेट लगाए, हेल्मेट लगाओ जान बचाओ, हेल्मेट पहनकर गाडी चलाए अपनी और दुसरोकी जान बचाए, दुपहिया वाहनपर सुरक्षाका एकही सहारा सिरपर हेल्मेट हमारा, न शौक ना मजबुरी हेल्मेट पहनना है जरुरी” अशा घोषणा दिल्या. रॅलीच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके, अशफाक अहेमद यांच्यासह तीनही कार्यालयातील सर्व मोटार वाहन निरिक्षक, सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. रॅलीत आरटीओतील सावित्री पथक प्रमुख स्नेहा मेढे यांच्यासह पथकातील सगळे अधिकारी सहभागी झाले होते.

अपघातांची संख्या चिंताजनक

नागपूर शहरातीस रस्ते अपघातांची संख्या मोठी आहे. प्रत्येक सहा महिन्यात येथे पाचशेहून जास्त अपघात नोंदवले जात असून त्यात शंभरावर नागरिकांचा मृत्यूही होतो. सर्वाधिक अपघात व मृत्यू दुचाकी वाहनांशी संबंधित असून अनेक प्रकरणात हेल्मेट नसणेही मृत्यूचे एक कारण आहे. शहरात जानेवारी ते जून २०२३ या सहा महिन्यांत ५०२ अपघातात ११६ जणांचा मृत्यू झाला. ५५० हून अधिक जखमी झाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Helmet rally of women rto officers in nagpur mnb 82 mrj