गोंदिया: विदर्भातील महानगर व बहुतांश जिल्हात गेल्या कित्येक वर्षांपासून कडेकोटपने हेल्मेटसक्ती लागू करण्यात आलेली आहे, पण गोंदिया जिल्हा या पासून आजपर्यंत वेगळा होता. पण जिल्हयातील महामार्गावर व इतर ही प्रमुख मार्गांवर दिवसेंदिवस अपघाताची सुरू झालेली मालिका थांबण्याचा नावच घेत नसल्यामुळे अखेर जिल्हा वाहतूक विभागाला सक्तीचे धोरण अवलंब करून गोंदिया जिल्ह्यात ही हेल्मेटसक्ती चे नियम लागू करण्याचे ठरविल्याने गोंदिया जिल्हा वाहतूक विभागाला हे उशिरा सुचलेलं शहाणपणच म्हणावे लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोंदिया शहरासह जिल्ह्यात दुचाकीचालकांना हेल्मेट वापरणे बंधनकारक असणार आहे. विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांना अडवून परत घरी पाठविले जाणार आहे. त्यामुळे हेल्मेट घालूनच घराबाहेर पडणे हिताचे ठरणार आहे. जिल्ह्यातील अपघातांच्या संख्येत वाढ झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने व अपघात कमी करण्यासाठी जिल्हा पोलिस विभागाकडून मोटार वाहन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक जयेश भांडारकर यांनी शुक्रवार ७ जुलै रोजी याबाबतचे पत्र सर्व पोलिस ठाणे प्रमुखाना जारी केले आहे.

हेही वाचा… राज्यात अजूनही पेरणीयोग्य पाऊस नाही

गोंदिया शहर व जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील मुख्य व इतर सर्व रस्त्यांवर दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्ती लागू करण्याचा निर्णय नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला होता. आकडेवारीनुसार जिल्ह्यात गतवर्षात अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये ७० टक्के मृत्यू डोक्याला दुखापत झाल्यामुळे झाले आहे. यामध्ये दुचाकीचालक आणि पाठीमागे बसलेल्यांची संख्या अधिक आहे.

हेही वाचा… दुचाकीवरील छायाचित्रांवरून अजित पवारांना समर्थन; ओबीसी सेल महानगराध्यक्षांच्या कृतीची चर्चा

अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक पोलिस विभागाकडून मोटार वाहन नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांविरुद्धच्या कारवाईमध्ये वाढ करण्यात येणार आहे. दुचाकीस्वारांनी चांगल्या प्रतीचे हेल्मेट परिधान करूनच प्रवास करावा. अन्यथा मोटार वाहन कायद्यानुसार दंड व परवाना निलंबनाची कारवाई केली जाणार आहे. जिल्ह्यात हेल्मेट परिधान करण्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. त्यानंतर आठवडाभराने दुचाकीचालकांना व मागे बसलेल्यांना हेल्मेट परिधान करणे सक्तीचे राहणार आहे

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Helmets will be compulsory in gondia district sar 75 dvr
Show comments