नागपूर : अनैतिक संबंधामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. मात्र, प्रेमासाठी वाट्टेल ते करणाऱ्या प्रेमविरांची काही कमी नाही. अशाच प्रेमसंबंधातून एका प्रेमविराने प्रेयसीला मारहाण करणाऱ्या तिच्या पतीचा काटा काढला. प्रेयसीला मारहाण केल्यामुळे तिच्या पतीचे गुप्तांग ठेचून खून केला. उमेश (३०) असे खून झालेल्या युवकाचे तर रविंद्र घारपूरे (परसोडी) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रविंद्र घारपुरे हा विहिरी बांधकामाचा ठेकेदार आहे. त्यामुळे त्याच्याकडे बक्कळ पैसा आहे. तो विवाहित असून त्याला एक मुलगा आहे. पत्नी असतानाही त्याची नजर शेजारी राहणाऱ्या उमेशची पत्नी नितावर गेली. त्याला निता (२५) आवडायला लागली. त्यामुळे त्याने उमेशच्या घरी येणे-जाणे सुरु केले. दोघांचे शेजारी म्हणून चांगले संबंध असल्याने त्याला संशय आला नाही. यादरम्यान रविंद्रने निताशी हळूहळू मैत्री करीत तिच्याशी संबंध वाढवले. उमेशला दारूचे व्यसन असल्यामुळे रविंद्र त्याला नेहमी दारू पाजत होता. निताला त्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढले.

हेही वाचा >>> यवतमाळ : “मरणाने केली सुटका, जगण्याने…”, गँगरीन झालेल्या निराधार वृद्धेची कहाणी

दारुड्या पतीकडून सुख मिळत नसल्याने नितासुद्धा रविंद्रच्या प्रेमात पडली. दोघांचे अनैतिक संबंधाची कुणकुण रविंद्रच्या पत्नीला लागली. तिने पतीला विचारणा केली असता त्याने गावात अफवा उडविल्या जात असल्याचे सांगितले. त्यानंतर तो मध्यरात्रीनंतर निताच्या घरी जायला लागला. दारुच्या नशेत असलेल्या पतीला सोडून दोघांच्या रात्रीला भेटी व्हायला लागल्या. गेल्या आठवड्यात तिचा पती झोपेतून उठला असता पत्नी बेडवर न दिसल्याने त्याने तिचा शोध घेतला. त्यावेळी ती घराच्या पाठीमागे अंधारात रविंद्रशी बोलत उभी असल्याचे पतीला दिसले. उमेशने तिला आवाज देताच रविंद्रने पळ काढला. त्यामुळे उमेशला पतीच्या अनैतिक संबंधाबाबत माहिती कळली. त्याने पत्नीला त्या रात्री बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याने रविंद्रशी यानंतर प्रेमसंबंध न ठेवण्याची तंबी दिली. तिनेही होकार देत संसाराकडे लक्ष देण्याचे ठरविले.

हेही वाचा >>> बालविवाह प्रतिबंधक उपाययोजना नावापुरत्याच! पाच वर्षांत देशात ३,२५४, राज्यात १८५ प्रकरणे

मात्र, पती रविंद्रशी असलेल्या प्रेमसंबंधाचा विषय काढून रोज मारहाण करायला लागला. त्यामुळे निता रोजच्या कटकटीला त्रस्त झाली. एवढा त्रास असतानाही दोघांचे अनैतिक संबंध सुरुच होते. शुक्रवारी सकाळी निताने प्रियकर रविंद्रला बोलावून पतीने मारहाण केल्याची माहिती दिली. त्यामुळे तो चिडला. त्याने उमेशचा काटा काढण्याचे ठरविले. शुक्रवारी सायंकाळी उमेशला दारु प्यायला तालुक्याला नेले. तेथे दोघांनी दारु ढोसली. घरी परत येत असताना शेतात उमेशच्या गुप्तांगावर मोठा दगड घातला. त्यात उमेशचा मृत्यू झाला आणि रविंद्रने गावातून पळ काढला.

नितालाही होणार अटक?

निता आणि रविंद्रचे अनैतिक संबंध होते, याची गावात चर्चा होती. त्यामुळे उमेशचा खून रविंद्रने केल्याचा संशय ठाणेदार मनोज चौधरी यांना आला. त्यांनी तांत्रिक पुरावे गोळा करून रविंद्रला अटक केली. त्याने नितासोबत असलेले प्रेमसंबंध आणि प्रेयसीला होणारा त्रास सहन न झाल्याने खून केल्याची कबुली दिली. मात्र, या हत्याकांडात प्रेयसी निता हिचा सहभाग आहे का?, याचा तपास पोलीस करीत आहेत. सहभाग असल्यास नितालाही आरोपी करून अटक होण्याची शक्यता आहे.