लोकसत्ता टीम

गोंदिया : २६ एप्रिल पासून १५ जून पर्यंत मलकाझरी येथे वास्तव्याला असलेला रानटी हत्तीचा कळप आता परतीच्या प्रवासाला लागला असून सध्या गेल्या तीन-चार दिवसांपासून इटियाडोह धरण परिसरात त्यांचा मुक्त संचार सुरू आहे. हत्तीच्या दर्शनासाठी पर्यटकांची पावले सध्या इटियाडोह धरणाकडे वळत आहेत.

local train block jogeshwari to Goregaon
मुंबई : जोगेश्वरी – गोरेगाव दरम्यान ब्लॉक, राम मंदिर स्थानकात लोकल थांबणार नाही
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
loksatta satire article on uddhav thackeray chopper checking
उलटा चष्मा : तपासण्यांची उड्डाणे
Nagpur Kolkata bomb threat
आकाशात झेपावलेल्या विमानात बॉम्ब ठेवल्याचा फोन अन्…
IRCTC Refund Policy check how much refund will be given on canelled tickets of trains
IRCTC Refund Policy: ट्रेनची तिकीट रद्द केल्यावर किती ‘रिफंड’ मिळतो? जाणून घ्या सविस्तर
flat Palava Colony animals, Dombivli Palava Colony animals, Dombivli flat animals
डोंबिवली पलावा वसाहतीमधील अलिशान सदनिकेतून विदेशी वन्यजीव जप्त, ठाणे वन विभागाची कारवाई
Passenger service from Dadar to Ratnagiri stopped Mumbai news
दादरवरून थेट रत्नागिरी जाणारी पॅसेंजर सेवा बंद; प्रवाशांचे हाल

१५ जून रोजी हत्तींचा कळप चुटीया ते झाशीनगर येथील जंगलमार्गे भ्रमंती करत रात्री अंदाजे १२ वाजता तिडका या गावामध्ये पोहोचला. या गावाशेजारी एक वनतलाव आहे. त्या ठिकाणी बराच वेळ थांबला. जेव्हा गावकऱ्यांना हत्तीच्या ओरडण्याचा आवाज आला, तेव्हा गावकरी घाबरून एकमेकांच्या घराच्या छतावर जावून थांबले होते. या दरम्यान हत्तींनी कोणालाही कसलाच त्रास न देता पुढे येरंडी दर्रेच्या जंगलाच्या दिशेने मार्गक्रमण केले. १६ जून रोजी परत सकाळी १० च्या सुमारास हत्तीच्या कळपाचे लोकांना दर्शन झाले. इटियाडोह जलाशयामध्ये हत्तीचा कळप अंघोळ करताना एक किलोमीटर अंतरावरून बऱ्याच नागरिकांनी त्यांना पाहिले. कळप येरंडी जंगलमार्गे इटियाडोह धरणाकडे वळला आहे, अशी माहिती तिडका, येरंडी येथील गावकऱ्यांनी दिली.

आणखी वाचा-गडकरींच्या प्रयत्नातून साकारलेल्या भट सभागृहात कार्यक्रमाला आलेल्यांची गैरसोय, स्वच्छतागृहातील नळ निकामी

राष्ट्रीय उद्यानाचे वनपरिक्षेत्राधिकारी सचिन डोंगरवार यांनी या बाबीला दुजोरा दिला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्याच गोंदिया जिल्ह्यात धूमाकुळ घातलेल्या रानटी हत्तींच्या कळपाने अर्जुनी मोरगाव तालुक्यात २६ एप्रिल रोजी पुनरागमन केले होते. मागील वर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात हा कळप गडचिरोली जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्यात दाखल झाला होता. नवेगावबांध वनपरिक्षेत्रांतर्गत कवठा जंगल परिसरात हत्तींनी बस्तान मांडले होते. बोळदे, कावठा, डोंगरगाव, इंजोरी, अरततोंडी, बोरटोला, सिरेगावबांध या गावात हत्तीच्या कळपाने धान व ऊस पिकांचे नुकसान केले होते. ३ ऑक्टोबर २०२२ ला हत्तींच्या कळपाने अर्जुनी मोरगाव तालुक्यातील तिडका येथील एका आदिवासी शेतकऱ्याला ठार केले होते. १२ ऑक्टोबरच्या रात्री नागनडोह येथील आदिवासींच्या वस्तीवर हल्ला करून त्यांच्या घराची व इतर जीवनोपयोगी साहित्याची नासधूस केली होती. त्यामुळे गावातील भयभीत आदिवासी जीव मुठीत घेऊन गाव सोडून पळाले होते. त्यानंतर हत्तींचा कळप गडचिरोली जिल्ह्याच्या दिशेने वळला होता. २६ एप्रिल ला हत्तींच्या पुनरागमनामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा दहशत पसरली होती.

आणखी वाचा-गोंदिया-भंडारा लोकसभा मतदार संघावरील दाव्यावरून भाजपा-शिंदे गटात जुंपली; खासदार सुनील मेंढे म्हणतात…

हत्तीच्या कळपाची हालचाल व धोका लक्षात घेऊन वनविभागाच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पथकांसह सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. हे रानटी हत्तींचे कळप स्थिरावले की काय, असे वाटत असतानाच गेल्या चार दिवसांचा त्यांचा मार्गक्रमण बघता ते परतीच्या वाटेवर असल्याचे जाणवत आहे.

२६ एप्रिलपासून १५ जूनपर्यंत नवेगाव राष्ट्रीय उद्यान व नवेगाव वन्यजीव अभयारण्यातील मलकाझरी परिसरात हत्तीचे वास्तव्य होते. त्यानंतर, आता चुटिया गावाजवळ रस्ता ओलांडत तिडका मार्गे गोठणगाव बॅक वॉटर क्षेत्रात सध्या हत्ती वास्तव्याला आहेत. हत्ती दिसल्यास मागे लागू नये, ओरडू नये, हॉर्न वाजवू नये, वनरक्षक, वनपाल यांना कळवावे, हत्ती कधीच एका जागेत स्थिरावत नाही. त्यांचा सध्याचे मार्गक्रमण बघता ते परतीच्या प्रवासाला लागले असावे. ते गडचिरोली मार्गे छत्तीसगढकडे परत जाण्याची शक्यता आहे. -सचिन डोंगरवार, वनपरिक्षेत्राधिकारी नवेगावबांध, राष्ट्रीय उद्यान.