वर्धा: रानातल्या अस्वलीबाबत अनेकांना कुतूहल असते. त्यातूनच अनेक गैरसमज निर्माण झाले आहे. बोर अभयारण्यात मोठ्या प्रमाणात अस्वलीचा अधिवास आहे.त्यामुळे येथे अस्वलींवर विशेष लक्ष ठेवले जाते. बोर व्याघ्र प्रकल्पात वनरक्षक म्हणून कार्यरत मनेशकुमार सज्जन यांनी २०१४ पासून शंभरपेक्षा अधिक अस्वलींचा मागोवा घेत निरीक्षण टिपले आहे. अस्वल गुदगुल्या करते, अशी चर्चा असते. ती खोटी असल्याचे सज्जन म्हणतात. अस्वल हाताने आपल्या सावजाला घट्ट पकडते. त्यात जीव कोंडतो. मात्र त्यामुळेच अस्वल पकडल्यावर गुदगुल्या करत असल्याचा गैरसमज झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अस्वल झाडावर उलटी चढते, हा पण गैरसमज आहे. असंख्यवेळा अस्वलींचे निरीक्षण केल्यावर त्या झाडावर चढतांना व झाडावरून खाली उतरतांना माकडाप्रमाणेच चढातात. एकदाही अस्वल उलट दिशेने चढताना झाडाच्या खोडाला कवेत धरून त्या चढतात. अस्वल वारूळ खोदून वाळवीच्या राजास खाते, अशी बोलवा आहे. त्यामुळे कमजोर पुरूषांनी नर अस्वलाचे लिंग विड्याच्या पानात खाल्यास नपुंसकता दूर होते व पौरूषत्व वाढते, असा भ्रामक समज आहे.

हेही वाचा >>>नागपूर विभागात ‘या’ ५०० जागांची भरती होणार, आयुक्तांनी घेतला आढावा

तर अस्वल केवळ वारूळच खोदत नाही. अन्य जागेतही खोदकाम करते. वनक्षेत्रात शेण पडलेल्या ठिकाणी अस्वलीने खोदलेले खड्डे आढळून आले आहे. जमिनीतल्या खोलगट भागात मातीचे गोळे असतात. त्या गोळ्यात असलेल्या शेणकिड्यांना अस्वल भक्ष्य करते. वारूळात असंख्य वाळवी, अळ्या व सरपटनाऱ्या प्राण्यांचे अंडे असतात. त्या खाण्यासाठी अस्वली वारूळ खोदतात. अस्वलींना टणक पदार्थ, मांस आदी चावून बारीक करता येत नाही. त्यामुळे गुळगुळीत मुलायम किटक हेच त्यांचे खाद्य असते. अस्वल संवर्धन ही काळाची गरज असल्याने त्याबाबत शिकार होत असल्यास सूचीत करण्याचे आवाहन वनरक्षक सज्जन करतात.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Here are many misconceptions about beer pmd 64 amy
Show comments