राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांना मुंबईबाहेर जाण्यास न्यायालयाने बंधने घातली होती. त्यामुळे तब्बल एक वर्ष, एक महिना आणि २७ दिवस तुरुगांत काढल्यानंतर आणि जामीन मिळूनही त्यांना त्यांच्या मतदारसंघात जात येत नव्हते.
हेही वाचा- वर्धा : उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या कानपिचक्या; भाजप नेत्यांना आले भान, मगच मांडव भरला छान
मतदारसंघात जाण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली होती. त्यांची ही विनंती मान्य झाली आहे. त्यामुळे ते ११ फेब्रुवारी २०२३ नागपुरात येत आहे. त्यांच्या स्वागताची कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचे आरोप झाले होते. मात्र त्यासंदर्भातील पुरावे सादर करण्यात तपास यंत्रणा सादर करू शकल्या नाहीत.