लोकसत्ता टीम
नागपूर : स्पर्धा परीक्षांमध्ये घोळाबाबत देशभरात नाराजीचे सूर उमटत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये प्रचंड रोष बघायला मिळत आहे. यात नॅशनल टेस्टिंग एजेन्सी (एनटीए) मार्फत घेतल्या जाणाऱ्या जेईई मेन्स परीक्षेत नवा घोळ झाल्याचे समोर आले आहे. जेईई मेन्स परीक्षेत एकाच विद्यार्थ्याला वेगवेगळे गुण दिल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एनटीए ला जबाब देण्याचे आदेश दिले. ७ ऑगस्टपर्यंत एनटीएला उच्च न्यायालयात बाजू मांडायची आहे.
तन्मय विनोद पाटील या विद्यार्थ्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याबाबत याचिका दाखल केली. विद्यार्थ्याने याचिकेत आरोप केला आहे की त्याने यंदा दिलेल्या जेईई मेन्स परीक्षेत एनटीएकडून घोळ करण्यात आला. परीक्षेत त्याला एमआर-१७००५७५९ हा रोल नंबर दिला गेला. परीक्षा झाल्यावर या रोल नंबरवर गुण तपासले असता तन्मयला ८९.८२ पर्सेंटाईल मिळाल्याचे दाखविण्यात आले. मात्र याच रोल नंबरचा वापर करून दुसऱ्यांदा गुण तपासल्यावर विद्यार्थ्याला २९.८२ पर्सेंटाईल दाखविण्यात आले. याचिकाकर्त्या विद्यार्थ्याने हा गोंधळ परीक्षा घेणारी संस्था एनटीएकडून झाला असल्याचा दावा केला. याबाबत त्याने १४ जुलै रोजी एनटीएक़डे ईमेलच्या माध्यमातून तक्रारही केली. यावर एनटीएच्या वतीने उत्तर देण्यात आले की विद्यार्थ्याने परीक्षेसाठी दोनदा नोंदणी केली. त्यामुळे हा घोळ झाला आहे. जेईई मेन्स परीक्षेतील नियमांचे उल्लंघन केल्यामुळे सायबर पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याचा इशाराही एनटीएने विद्यार्थ्याला दिला.
आणखी वाचा-“शरद पवारांकडून दंगल घडवण्याची भाषा”, भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची टीका; म्हणाले…
दुसरीकडे, विद्यार्थ्याने दोनदा नोंदणी केली असल्याचा दावा फेटाळून लावला. विद्यार्थ्याने याप्रकरणी १६ जुलै रोजी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली. सुनावणीदरम्यान याचिकाकर्ता विद्यार्थी यांनी न्यायालयाला सांगितले की त्यांच्याकडून केवळ एकदा नोंदणी करण्यात आली. न्यायालयाने विद्यार्थ्याला एका आठवड्यात याबाबत लिखित स्वरुपात माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. याचिकेवर पुढील सुनावणी ७ ऑगस्ट रोजी होणार आहे. याचिकाकर्त्या विद्यार्थ्याच्यावतीने ॲड.एस.पालीवाल यांनी बाजू मांडली.
आणखी वाचा-नागपुरात घरात पाणी, संतप्त नागरिकांनी रस्ताच तोडला
दुहेरी नोंदणी नाही
‘एनटीए’ ने विद्यार्थ्यावर दोनदा नोंदणी केली असल्याचा आरोप लावला होता. यानंतर उच्च न्यायालयाने दोनदा नोंदणी केली नसल्याबाबत लिखित स्वरुपात शपथपत्र सादर केले. न्यायालयाने सुनावणीदरम्यान शपथपत्र रेकॉर्डवर घेतले आणि शपथपत्रातील माहितीवर समाधान व्यक्त केले. यानंतर एनटीएला त्यांची बाजू मांडण्यासाठी न्यायालयाने नोटीस दिला. हा नोटीस एनटीएला देण्यासाठी सर्व प्रकारची साधने वापरण्याची मुभाही न्यायालयाने याचिकाकर्त्या विद्यार्थ्याला दिली.