नागपूर : कमावती असूनही  बेरोजगार असल्याचे सांगून पतीकडून पोटगी घेत असलेल्या महिलेला न्यायालयाने दणका दिला.  न्यायालयाने कमाई करणाऱ्या महिलेची पतीकडून मिळणारी पोटगी बंद करण्याचे आदेश दिले.  बुलडाणा जिल्ह्यातील दाम्पत्याचे १५ डिसेंबर १९९८ मध्ये लग्न झाले होते. त्यांना २२ वर्षांची मुलगी व १५ वर्षांचा मुलगा आहे. दोन्ही अपत्ये आईसोबत राहतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; वन परिक्षेत्र अधिकाऱ्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

काही वर्षांनी कौटुंबिक वाद विकोपाला गेल्यामुळे दोघेही विभक्त झाले. त्यामुळे पत्नीने स्वत:सह अपत्यांना पोटगी मिळण्यासाठी कुटुंब न्यायालयात अर्ज दाखल केला होता. १२ ऑगस्ट २०२२ रोजी कुटुंब न्यायालयाने पत्नी व दोन मुलांसाठी महिन्याला पाच हजार रुपये पोटगी मंजूर केली होती. पत्नी कमावती असल्यामुळे तिच्या मंजूर पोटगीला विरोध होता. त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. दरम्यान,  पत्नीने स्वतःचे उत्पन्न लपवून ठेवल्याचा दावा पतीने केला. पत्नीला दोन दुकानांचे भाडे मिळते. तसेच ती खानावळ चालविते. त्यामुळे तिला पोटगीची गरज नाही, असेही त्याने सांगितले. या मुद्यांमध्ये गुणवत्ता आढळून आल्यामुळे पतीला दिलासा मिळाला. उच्च न्यायालयाने पत्नीची पोटगी रद्द केली. तसेच, मुलगी लग्न होतपर्यंत आणि मुलगा सज्ञान होतपर्यंत पोटगीस पात्र राहील, असेही स्पष्ट केले.