लोकसत्ता टीम
नागपूर: सासू-सासरे सोबत नको म्हणणाऱ्या आणि पतीला केवळ आपल्या दोघांचा संसार करण्यासाठी बाध्य करू पाहणाऱ्या पत्नीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात चपराक बसली. कुटुंब न्यायालयानंतर उच्च न्यायालयाने तिला पोटगीसाठी अपात्र ठरविले. न्यायमूर्ती गोविंद सानप यांनी हा निर्णय दिला.
प्रकरणातील दाम्पत्य नागपूरचे असून, त्यांचे १८ एप्रिल २०१८ रोजी लग्न झाले. लग्नानंतर पती व सासू-सासऱ्याने बौद्ध धर्म सोडून ख्रिश्चन धर्मात प्रवेश केला. पत्नी महानुभाव पंथाची अनुयायी आहे. तिने ख्रिश्चन धर्म स्वीकारला नाही. त्यामुळे पती व सासू-सासरे छळ करीत होते.
हेही वाचा… नागपूर: ‘मोका’नंतर आता ‘फॅबीयन’ चक्रीवादळाचे संकट; भारतावर काय परिणाम होणार, जाणून घ्या
त्यांनी तिला घराबााहेर काढल्याने ती माहेरी निघून गेली, असा आरोप केला गेला होता. परंतु आरोप सिद्ध झाले नाहीत.