प्रत्येक निवडणूक जिंकण्यासाठी लढणा-या भारतीय जनता पक्षाने आगामी निवडणुकीसाठी तयार केलेल्या ‘वॉर रूम’ मध्ये बुथ पासून तर निवडणूक मतदान केंद्रापर्यंत सर्व आकडेवारी उपलब्ध असून त्याचे विश्लेषण करून रणनीती तयार केली जाणार आहे.
हेही वाचा >>> नागपूर: देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्क कार्यालयापुढे हनुमान चालीसा पठणाचा प्रयत्न; पोलिसांनी महिलांना..
भाजप कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या अत्याधुनिक ‘वॉर रुम’ मध्ये आठ संगणक आहेत. या संगणकाच्या माध्यमातून विदर्भातील आतापर्यंतच्या लोकसभा, विधानसभा, महापालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला मिळालेली मते, त्यात पुढच्या निवडणुकीत झालेली कमी-अधिक वाढ, बुथची संख्या , बुथ कर्मचाऱ्यांची संख्यया बुथ निहाय मिळालेल्या मतांची संख्या यासह इतर सर्व बाबी ज्या निवडणूक विश्लेषणासाठी आणि त्यावर आधारित निवडणुका जिंकण्याच्या नियोजनासाठी कामी पडतात याची माहिती संग्रहित करण्यात आली आहे. निवडणुकीला रणांगण मानणाऱ्या भाजपने निवडणूक नियोजनाच्या कक्षाला ‘वॉर रुम’ असे नाव दिले आहे. मागच्या आठवड्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या ‘वॉर रुम’चे उद्घाटन करण्यात आले.