चंद्रपूरच्या तापमानाने सलग सहाव्या दिवशीसुद्धा उच्चांक गाठला असून सोमवारचे तापमान ४३.२ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. चंद्रपूरचे तापमान राज्यात सर्वाधिक असल्याने चंद्रपूरकरांना उन्हाच्या झळा सोसवेनाशा झाल्या आहे.
एप्रिल महिन्यांच्या सुरुवातीपासून चंद्रपुरातील तापमानात वाढ होऊ लागली आहे. मागील सहा दिवसांपासून तापमानात मोठी वाढ होत आहे. ११ एप्रिलपासून तापमाना वाढ होण्यास सुरुवात झाली असून सलग सहाव्या दिवशीसुद्धा तापमानाने उच्चांग गाठला आहे. १२ एप्रिल ४२.२, १३ एप्रिल ४३.२, १४ एप्रिलला ४२.८ तर, १७ एप्रिलच्या तापमानाने उच्चांक गाठत ४३.२ अंश सेल्सिअसची नोंद घेतली आहे. चंद्रपूरचे सोमवारचे तापमान राज्यात सर्वाधिक आहे.
त्यापाठोपाठ ब्रम्हपुरी ४३.१, वर्धा ४२.५, अकोल ४२.८, गोंदिया ४२.८, अमरावती ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली आहे. त्यामुळे चंद्रपूरकरांची लाहीलाही होत असून वातानुकूलित यंत्रे घरा-घरात लागली आहेत. दुपारच्या सुमारास नागरिकांनी घराबाहेर जाणे टाळले आहे.