देशात बेरोजगारीची समस्या किती मोठ्या प्रमाणात आहे याचा प्रत्यय  नागपुरातील मोतीबाग फुटबॉल मैदनावर आला. ड श्रेणीतील नोकर भरतीसाठी उच्च शिक्षित तरूण- तरूणीमोठ्या संख्येने नौकर भरतीसाठीआले आहेत. दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे अंतर्गत ‘ग्रुप डी’करिता भरती प्रक्रिया नागपुरातील मोतीबाग येथील फुटबॉल मैदानावर सोमवारपासून सुरू झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> “संजय राऊतांचा मला फोन आला आणि त्यांनी…”, आमदार कपिल पाटलांनी सांगितला उमेदवार माघारीचा किस्सा

तीन वर्षापूर्वी रेल्वे भरती मंडळाने लेखी परीक्षा घेतली होती. उत्तीर्ण उमेदवाराची शारीरिक क्षमता चाचणी आता २०२३ मध्ये घेतली जात आहे. या परीक्षेसाठी देशभरातून सुमारे ८०० ते १००० उमेदवार नागपुरात पोहोचले आहेत. परीक्षा पारदर्शक होण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. ही भरती प्रक्रिया दोन ते तीन दिवस चालण्याची शक्यता आहे. भरती केंद्रावर बाहेरचा कोणीही आत जाऊ शकणार नाही यासाठी भरतीच्या ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. उमेदवारांसाठी मोतीबाग येथील क्रीडा भवनात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Highly educated people apply for group d jobs in indian railways rbt 74 zws