वर्धा: दिवाळीनंतर शेतकऱ्यांनी आपला शेतमाल बाजारात विक्रीसाठी आणणे सुरू केले. त्यात माल विकण्यास हिंगणघाट बाजार समितीला प्राधान्य मिळाल्याचे दिसून येते. ही बाजार समिती विदर्भात सोयी सुविधांबाबत अव्वल समजली जाते.
हिंगणघाट बाजार समितीत या हंगामात माल विकण्यास गर्दी झाली. सोयाबीन ३ लाख ५९ हजार क्विंटल, कापूस ५७ हजार क्विंटल, तूर ६ लाख ६६ हजार क्विंटल, असा शेतमाल हिंगणघाट बाजार समितीत आला. जिल्ह्यात वर्धा, पुलगाव, सींदी, हिंगणघाट, समुद्रपुर, आर्वी, आष्टी, अशा सात बाजार समित्या आहेत. उर्वरित बाजार समितीतील आवक तुलनेने बरीच कमी असल्याची आकडेवारी पुढे आली आहे.
हेही वाचा… ‘१८ वर्षांवरील अनाथ, अपंग मुलांच्या पुनर्वसनासाठी कायदा करा; शंकरबाबा पापळकर यांची मागणी
प्रामुख्याने आता कापसाची आवक वाढू लागली आहे. भाव वाढण्याचा अंदाज व्यक्त होत असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्रीस आणलेला नाही. सध्या कापसाला चार ते सव्वा पाच हजार रुपये प्रती क्विंटलला भाव मिळत आहे.