वर्धा : हिंगणघाट येथे वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या उन्हाळी अधिवेशनात केली. पण त्यानंतरही वाद संपलेला नाहीच. आता जागेवरून आंदोलन सुरू झाले आहे. वेळा येथील खाजगी जागा व्यापारी फायद्यासाठी असल्याचा आरोप संघर्ष समितीने केल्यानंतर आमदार समीर कुणावार यांनी जागा आता विरोधकांनीच सुचवावी, असे, आव्हान देऊन टाकले. तसेच जागेसाठी मुंबईत ठाण मांडून बसल्याचे ते सांगतात. तर खाजगी नव्हे तर शासकीय जागेवरच हे महाविद्यालय व्हावे असा समितीचा आग्रह आहे. हे महाविद्यालय हिंगणघाट येथेच व्हावे म्हणून संघर्ष समितीने केलेल्या प्रयत्नाचे प्रत्येक हिंगणघाटकरास कौतुक आहे. त्यामुळे आता ते घेत असलेल्या भूमिकेस वजन आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता कोल्ही, नांदगाव, जाम अश्या वेगवेगळ्या जागेबाबत वाद व आंदोलन सुरू झाल्याने तिढा वाढला. पण महाविद्यालय तात्पुरत्या स्वरुपात सुरू होणे आवश्यक असल्याची बाब दुर्लक्षित होत आहे. कारण या सत्रातील वैद्यकीय प्रवेश आता सुरू होतील. त्यात हिंगणघाटचा समावेश राहणार की नाही, यावर लक्ष केंद्रित झाले पाहिजे, असे या वादावर लक्ष ठेवून असलेल्या एका नेत्याने स्पष्ट केले. यावर्षी जर येथे प्रवेश झाले नाही तर पुढील सत्रात होणार, याची शाश्वती देणार कोण, असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. महाविद्यालय सुरू झाल्यास सिव्हिल सर्जन दर्जाचे किमान १५ अधिकारी दाखल होतील. म्हणून शासनाची भूमिका स्पष्ट होणे आवश्यक ठरते.

हेही वाचा – Nagpur Crime Update: एकाच भूखंडाची दोघांना विक्री…महिलेची फसवणूक

हेही वाचा – धावत्या कारमध्ये प्रेमीयुगुलाचे अश्लील चाळे…इंस्टावर चित्रफित प्रसारित होताच…

हीच बाब हेरून माजी खासदार रामदास तडस यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देत जागेची विनंती केली. ते म्हणतात की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जिल्ह्यासाठी भूषण ठरते. ते मंजूर झाल्याने संपूर्ण जिल्ह्यास फायदा मिळणार. परंतु जागेच्या वादात जिल्ह्याचे नुकसान होणार. तसे होवू नये म्हणून प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिकांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. वैद्यकीय क्षेत्रातील संभाव्य नुकसान टळावे म्हणून वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेबाबत हस्तक्षेप करावा व तोडगा काढावा, असे साकडे तडस यांनी फडणवीस यांना घातले आहे. तर या मुद्द्यावरून हिंगणघाट येथील वातावरण चांगलेच संवेदनशील झाल्याच्या घटना घडू लागत आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर वाद झडत आहे. पोलीस प्रशासनाने एक खास बैठक घेत व्हॉट्सअ‍ॅपवर चुकीची भाषा वापरल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा ईशारा दिला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hinganghat if the admission is delayed will the medical college go elsewhere request to devendra fadnavis for medical college seat pmd 64 ssb
Show comments