नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. येत्या २० नोव्हेंबरला राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे. यंदा महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत होणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. राज्यातील दिग्गज नेत्यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपच्या नागपूर जिल्ह्यातील एका आमदाराच्या संपत्तीमध्येही तब्बल १०२ कोटींनी वाढ झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या संपत्तीचे विवरण समोर आले आहे.

समीर मेघेंची २०१९ आणि आताची संपत्ती किती?

हिंगणा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार समीर मेघे यांच्या संपत्तीत पाच वर्षांमध्ये तब्बल १०२ कोटींनी वाढ झाली आहे. २०१९ मध्ये मेघे यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता धरून संपत्ती १५९ कोटींची होती. त्यात वाढ होऊन २००४ मध्ये २६१ कोटी झाली आहे. समीर मेघे हे २०१४ मध्ये हिंगणा मतदारसंघातून भाजपच्या जागेवर निवडून आले. त्यानंतर २०१९ मध्येही त्यांनी विजय मिळवला. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नजीकचे आहेत. तर माजी खासदार दत्ता मेघे यांचे ते पुत्र आहेत. समीर मेघे यांनी २०१९ मध्ये उमेदवारी अर्ज भरताना त्यांच्या संपत्तीचे विवरण दिले होते. त्यानुसार त्यांच्या परिवाराकडे १५९ कोटी ५९ लाखांची संपत्ती होती. मेघे यांनी उत्पन्नाचे माध्यम व्यवसाय दाखवले आहे.

Ranjit kamble
Video: ‘लाडकी बहिण’ची थट्टा आमदार रणजीत कांबळेंना भोवणार?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
dr ravindrakumar Singal
नागपूर पोलीस आयुक्तांच्याच नावे बनावट फेसबुक खाते
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti Mahavikas Aghadi final Seat Sharing Formula
Maharashtra Assembly Election 2024 : महायुती व महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! सहा पक्षांकडून इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
akola bjp leader ravi rathi
अकोला: दोन दिवसांत पक्षांतर अन् रवी राठी म्हणतात, “भाजपने केला घात…”
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…

हेही वाचा : अकोला: दोन दिवसांत पक्षांतर अन् रवी राठी म्हणतात, “भाजपने केला घात…”

संपत्तीचे सविस्तर विवरण बघा

२०२४ मध्ये उमेदवारी अर्ज भरताना मेघे यांनी त्यांची २६१ कोटी ३९ लाखांची संपत्ती दाखवली आहे. त्यांच्या संपत्तीमध्ये स्थावर मालमत्ता ही ८६ कोटी ५६ लाख ९ हजार इतकी आहे. तर जंगम मालमत्ता १७४ कोटी ८३ लाख ६ हजार इतकी आहे. जंगम मालमत्तेमध्ये त्यांच्या पत्नी व्रिंदा मेघे यांच्या नावे ६० कोटी ८३ लाख, समीर मेघेंच्या नावे १०९ कोटी ४९ लाख आणि १ कोटी १० लाख इतकी संपत्ती आहे. मुलगी रिधीमा मेघे नावेही ३ कोटी ३९ लाख ४१ हजारांची संपत्ती आहे. तर स्थावर मालमत्तेमध्ये समीर मेघेंच्या नावे ५९ कोटी ७३ लाखांची संपत्ती आहे. पत्नी व्रिंदा मेघेंच्या नावे २६ कोटी ८२ लाखांची संपत्ती आहे.

Story img Loader