महेश बोकडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर: वीज यंत्रणेच्या खासगीकरणाला विरोधासह इतर मागण्यांसाठी वीज कर्मचारी- अधिकाऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाचा फटका आता महानिर्मितीलाही बसू लागला आहे. महानिर्मितीच्या राज्यभरातील वीज निर्मितीचे पाच संच कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे बंद पडले आहेत. या संचाची क्षमता १ हजार ३८० मेगावॅट आहे. परंतु निश्चित उद्दिष्टानुसार महानिर्मिती ६ हजार मेगावॅट वीज निर्मिती करत असल्याचा दावा महानिर्मितीने केला आहे.

हेही वाचा >>> “अदानी हटाओ, देश बचाओ!” म्हणत वीज कर्मचाऱ्यांची अदानीसह सरकारच्या विरोधात घोषणाबाजी

महानिर्मितीतील कर्मचारीअभावी बंद कराव्या लागलेल्या संचामध्ये खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रातील २१० मेगावॅटचे २, ३ आणि ४ क्रमांकाचे संच, चंद्रपूर केंद्रातील ५०० मेगावॅटचा एक संच आणि पारस येथील २५० मेगावॅटच्या एका संचाचा समावेश आहे. दरम्यान, महानिर्मितीला ग्राहकांच्या मागणीनुसार ६ हजार मेगावॅट वीज निर्मितीचे लक्ष निश्चित करून दिले गेले आहे. त्यानुसार औष्णिक विद्युत केंद्रासह कोयनातील जलविद्युत केंद्राच्या मदतीने महानिर्मिती उद्दिष्टानुसार वीज निर्मिती करत असल्याचा दावा महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. दरम्यान, पारसचा निर्मिती संच आज सकाळी तांत्रिक कारणाने बंद पडला. कर्मचारी संपामुळे दुरूस्तीची येथे समस्या असून इतर संच कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे खबरदारी म्हणून बंद ठेवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

हेही वाचा >>> ‘अदानी गो बॅक’च्या घोषणा अन् अनेक गावांची ‘बत्ती गुल’; वाशीम जिल्ह्यातील वीज कर्मचारी आक्रमक

महानिर्मितीचे अधिकारी काय म्हणतात?

खरेतर हा संप महावितरणशी संबंधित आहे. यामध्ये महानिर्मितीचा प्रत्यक्षपणे कुठलाही संबंध येत नाही. महानिर्मितीची वीज ही खासगी वीज उत्पादकांशी निकोप स्पर्धा करून मेरिट ऑर्डर डीस्पॅच नुसार वापरली जाते. त्यामुळे महानिर्मितीशी निगडित ज्या संघटना आहेत त्यांनी संपात सहभागी होताना विचार करणे गरजेचे आहे.  वीज वितरण क्षेत्रात खासगी परवानाधारक येत असल्याने महावितरणच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्युत कायद्यानुसार परवाना देण्याचे काम राज्य वीज नियामक आयोगाचे आहे. त्यामुळे महानिर्मितीच्या कर्मचाऱ्यांनी संपाबाबत विचार करण्याची गरज असल्याचे महानिर्मितीचे अधिकारी म्हणतात.