नागपूर : काही दिवसांअगोदर पत्रपरिषद घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा असल्याचे वक्तव्य करत तशी चित्रफीत सामाईक करणे जनार्दन मून व जावेद पाशा यांना भोवले आहे. या दोघांविरोधातही पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. संघातर्फे मून आणि पाशा यांच्याविरोधात निवडणूक आयोग तसेच पोलीस आयुक्तांना तक्रार करण्यात आली होती.

संघाचे महानगर कार्यवाह बोकारे यांच्या तक्रारीनुसार मून यांनी काही कालावधीअगोदर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावानेच संस्था स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सहायक निबंधकांनी त्यांना नकार दिला होता. मून यांनी याविरोधात उच्च व सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, दोन्ही न्यायालयांनी त्यांची याचिका नामंजूर केली होती. मून यांच्या नावावर ‘आरएसएस’ नावाची कुठलीही संस्था नोंदणीकृत नाही. मात्र तरीदेखील विविध ठिकाणी पत्रपरिषदा घेऊन मून यांच्याकडून वक्तव्ये करण्यात येत आहे.

Bhandara, Congress-Pawar group Bhandara,
भंडारा : चरण वाघमारेंच्या ‘एन्ट्री’मुळे काँग्रेस-पवार गटाचे नेते आक्रमक; सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Loksatta anvyarth Baba Siddiqui shot and killed Law and order
अन्वयार्थ: कायदा आणि कुव्यवस्था?
Baba Siddique with Salman Khan and Shahrukh Khan iftar party
Baba Siddiqui Murder: सामान्य कार्यकर्ता ते मंत्री, बॉलीवूडमध्येही चलती; बाबा सिद्दीकींचा राजकीय प्रवास कसा होता?
Amit Deshmukh statement caused unease among Congress workers in Latur print politics news
अमित देशमुख यांच्या विधानाने लातूरात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता
pm narendra modi in maharashtra
“देशातील तरुणांना अंमलीपदार्थ विकून काँग्रेसला निवडणूक लढवायची आहे”, वाशिममधील सभेतून पंतप्रधान मोदींचे टीकास्र; म्हणाले…
sharad pawar marathi news
‘कोरेगाव भीमा’प्रकरणी गोष्टी वदविण्याचा प्रयत्न, कोणत्या राजकीय नेत्याने केला हा आरोप !
pimpri chinchwad NCP is on the verge of a split
पिंपरी-चिंचवड ‘राष्ट्रवादी’ फुटीच्या उंबरठ्यावर?

हेही वाचा – भावना गवळींना डावलले; यवतमाळ-वाशिममधून राजश्री पाटील यांना उमेदवारी

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मून आणि अब्दुल पाशा यांनी सोबत पत्रपरिषद घेतली व ‘आरएसएसचा काँग्रेसला पाठिंबा’ असे वक्तव्य केले व युट्यूबवर चित्रफीत बातमीच्या स्वरुपात सामाईक केली. हा समाजात भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करत संघातर्फे मून यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. सिताबर्डी पोलीस ठाण्यातील पथकाने या तक्रारीवर प्राथमिक चौकशी केली व चित्रफीतीची शहानिशा केली. पोलिसांनी मून व पाशा यांच्याविरोधात भां.द.वि.च्या कलम ३४, ४१९, ५०५(२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा – “काँग्रेस बाबासाहेबांप्रमाणे बाळासाहेबांनाही निवडून येऊ देत नाही”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका

सरसंघचालक डॉ. भागवत, राजेश लोयांविरोधात मून यांची पोलिसात तक्रार

विशेष म्हणजे माजी नगरसेवक जनार्दन मून यांनीही सरसंघचालक डॉ. भागवत, राजेश लोयांविरोधात पोलिसात तक्रार केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची संघटना स्थापन केली आहे. या संघटनेच्यावतीने लोकसभा निवडणुकीत त्यांनी नुकताच काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला. परंतु, नामसाधर्म्यामुळे मूळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मनस्ताप सहन करावा लागत आहे. याविरोधात संघाने निवडणूक आयोग, भारत सरकार आणि नागपूर पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. यावरून आता जनार्दन मून यांनी प्रतिउत्तर दिले आहे. आमच्या संघटनेचा ऑनलाईन नोंदणी अर्ज आहे. उलट अनोंदणीकृत संघाने केलेल्या तक्रारीच्या पत्रात संघटनेचा नोंदणी क्रमांक नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्या संघटनेचे नाव वापरलेले नाही. आमची संघटना संविधानिक मार्गाने न्याय मिळवणार आहे. त्यामुळे खोटी तक्रार दाखल केल्याबद्दल अनोंदणीकृत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, राजेश लोया आणि नरेंद्र बोकाडे यांच्याविरोधात यशोधरा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आल्याची माहिती मून यांनी पत्रकार परिषदेत दिली.