नागपूर : होळी व धूलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागातील बाजारपेठा रंग-पिचकारीने सजल्या आहेत. धूलिवंदनानिमित्त बाजारात चिनी पिचकारी आणि नैसर्गिक रंगांना मोठी मागणी आहे. गेल्या दोन वर्षे करोनामुळे होळी आणि धूलिवंदनासाठी निर्बंध असताना अनेकांना हा सण साजरा करता आला नाही. मात्र, यावेळी कुठलेही निर्बंध नसून बाजार विविध आकाराच्या पिचकाऱ्या व रंग उपलब्ध आहेत.
हेही वाचा >>> खळबळजनक! सुनेच्या प्रियकराचा सासूवर बलात्कार
इतवारी, महाल भागातील बाजारात विविध प्रकारचे नैसर्गिक रंग, लहानग्यांचे आकर्षण असणाऱ्या विविध प्रकारच्या पिचकऱ्यांच्या खरेदीला ग्राहकांची व लहानग्यांची गर्दी होत आहे. घाऊक दरात वस्तू मिळत असल्याने जादा ग्राहक खरेदीला येत असतात. बाजारात भारतीय बनावटीचे साहित्य उपलब्ध असून मागील वर्षीपेक्षा यंदा दर १५ ते २० टक्के कमी असल्याचे मत व्यापारांनी व्यक्त केले आहे.
बाजारात विविध प्रकारचे रंग असले तरी नैसर्गिक रंगाला अधिक मागणी करण्यात येत आहे. नैसर्गिक रंग २० रुपयापासून ते २५० रुपयापर्यंत तर ओले रंग १५०-२०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. तसेच यंदा बाजारात कलर ब्लास्टर, सिलेंडर स्प्रे रंग ही उपलब्ध असून ९००, १२५० ते १७०० रुपयांना उपलब्ध आहे. बाजारात विविध प्रकारच्या पिचकाऱ्या उपलब्ध असून यामध्ये विविध कार्टून्सच्या पिचकाऱ्यांची ‘क्रेज’ लहान मुलांमध्ये असते. लहान मुलांसाठी बंदूक आणि पबजी या खेळाची पिचकारी उपलब्ध आहे. यंदा आवाज येणार पिचकारी २५० रुपयांना मिळत आहे, असे इतवारीतील सुरभी पिचकारी स्टोअर्स विनीत ढबाले यांनी सांगितले.
हेही वाचा >>> नागपूर : रेल्वे रुळाच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांमुळे ‘या’ पॅसेंजर रद्द
लाकूड विक्रेत्यांकडे आगाऊ नोंदणी उद्या, सोमवारी शहरातील विविध भागात होळी पेटवली जाणार आहे. गेल्या दोन वर्षात काही ठराविक भागातच करोनामुळे होळी पेटवण्यात आली होती. यावेळी होलिकोत्सव सण साजरा करणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दोन दिवस आधीच लाकूड विक्रेत्यांकडे तशी मागणी, नोंदणी होऊ लागली असल्याचे महालातील जयस्वाल कोल डेपोतील महेश जयस्वाल यांनी सांगितले.