कविता नागापुरे
ऑगस्ट महिना सणासुदीचा. या महिन्यात शाळांना भरपूर सुट्या असतात. त्यात भर पडली ती श्रीकृष्ण जन्माष्टमीची. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जन्माष्टमीला सुटी राहील, अशी घोषणा केली. यामुळे विद्यार्थ्यांचे चांगलेच फावले. गेल्या काही दिवसांपासून सुटी देण्याची सवय जडल्याने काही शाळा व्यवस्थापनांनीही परस्पर सुटी देण्याचे धाडस केले. प्रशासनाकडून सुटीसंदर्भात कोणतेही आदेश नसताना शुक्रवारी श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांनी स्वमर्जिनेच निर्धारित वेळेपूर्वीच सुटी दिली. मुख्यमंत्र्यांनी सुटी दिल्याचे शाळा व्यवस्थापनाचे म्हणणे आहे, मात्र हा प्रकार पचनी न पडल्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांनी या शाळांना धारेवर धरले असून आदेश कुणाचा? असा प्रश्न विचारला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : मेटे यांच्या पत्नीला विधानपरिषद आमदार करा ; शिवसंग्राम संघटनेची मागणी

शुक्रवारी सर्वत्र कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली. सात दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी कृष्ण जन्माष्टमीची सुटी जाहीर केली होती. मात्र, ती मुंबई, ठाणे अशा महानगरपूरतीच मर्यादित होती. काल कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती यांनी काही शाळांना भेटी दिल्या असता अनेक शाळांनी सकाळपाळीत किंवा दुपारपाळीत शाळा भरवून परस्पर सुटीही देऊन टाकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यासाठी शिक्षण विभागाकडून पूर्वपरवानगी घेण्यात आली नाही. ही बाब शिक्षणाधिकारी यांच्या निदर्शनास येताच त्यांनी सर्व पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकऱ्यांना पत्राद्वारे ‘ कुणाच्या परवानगीने शाळांना सुटी देण्यात आली?’ अशी विचारणा करीत कारवाईचे आदेश दिले आहे.

कल्याणमध्ये पोलिसांचा खबरी म्हणून तरुणाला बेदम मारहाण

गेल्या काही दिवसात करोनातसेच वेगवेगळ्या कारणांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. शिवाय, शिक्षण विभागाकडून कोणतेही निर्देश नसताना परस्पर निर्णय घेणे गंभीर बाब आहे. सण साजरे करण्यास विरोध नाही, मात्र अशाप्रकारे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असेल तर कारवाई करणे गरजेचे आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) एस.शर्मा यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. या प्रकराणानंतर जि. प. शाळा तसेच पंचायत समिती स्तरावर एकच खळबळ उडाली आहे.