गोंदिया : भाजप म्हणजेच अखिल भारतीय खोटारडी पार्टी आहे. कलावती बांदूरकर प्रकरणी त्यांना भाजपच्या सरकारने मदत केली असल्याची खोटी माहिती ते देतात. यवतमाळ जिल्ह्यातील या महिलेला माध्यमांनी विचारणा केली असता या महिलेने राहुल गांधी यांनी घरी येवून सांत्वन केल्यानंतरच त्यांना शासकिय मदतीसह इतर सुविधा मिळाल्याचे सांगीतल्यावरून कळते की केंद्रीय गृहमंत्र्यांनी लोकसभेत खोटी माहिती दिली, असा आरोप महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी गोंदिया शासकीय विश्राम गृहात आयोजित पत्रपरिषदेत केला.

हेही वाचा >>> गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयातील भविष्यातील प्रकल्पांसाठी पाण्याचे नियोजन, वनमंत्र्यांकडून योजनेस मंजुरी

nitin gadkari
Nitin Gadkari : करोना, दंगली, लढायांपेक्षा अधिक मृत्यू अपघातांमुळे… खुद्द गडकरींनीच…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Amravati jat panchayat social boycott
धक्कादायक! जात पंचायतीच्या आदेश झुगारला म्हणून सामाजिक बहिष्कार
kalyan MNS citizens road agaitationTruck crushes mother, child
कल्याणमध्ये ट्रकने आई, मुलाला चिरडले; मनसेसह नागरिकांचे रस्ता रोको
Assam Assam Coal Mine Rescue
Assam: दुर्दैवी घटना! आसाममध्ये २०० फूट खोल बेकायदा कोळसा खाणीतून एका कामगाराचा मृतदेह काढला; ९ जण अद्यापही अडकलेलेच
Pune, girl call center was attacked, yerawada area
पुणे : कॉलसेंटरमधील तरुणीवर सहकाऱ्याकडून कोयत्याने हल्ला, येरवडा भागातील घटना; हल्लेखोर ताब्यात
One person died, eight injured , vehicle fell in valley,
ठाणे : वाहन दरीत कोसळून एकाचा मृत्यू तर आठ जण जखमी
deccan police registered case against four including woman for allegedly assaulting anti encroachment squad
फर्ग्युसन रस्त्यावर अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की; महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा

या प्रसंगी आमदार सहेसराम कोरेटी, माजी आमदार दिलीप बनसोड उपस्थित होते. वडेट्टीवार म्हणाले की भाजपच्या लोकांना खोटं बोलण्याशिवाय काहीच येत नाही. आणि दुस-यांच्या कर्तबगारीवर आपली पाठ थोपटून घेणे हाच भाजपचा धंदा आहे. यांचे दिवस आता भरलेले आहेत. कलावतींसह दिल्लीतील निर्भयाच्या भावाला पायलट करण्याचं काम राहुल गांधीनी केलं. यांचा गेल्या ९ वर्षात उल्लेखनीय अशा कोणताही काम नाही, विकास नाही. लोकसभेत राहुल गांधीनी लोकसभा अध्यक्ष यांच्याकडे पाहून फलाइंग किस दिली. बुधवारी राहुल गांधीनी जो धमाका आपल्या भाषमाद्वारे संसदेत केला त्याला यांना उत्तर देता येत नाही म्हणून आता अशा महिलांना पुढे करून त्यांना बदनाम करण्याचा घाट रचला जात आहे. भाजपच्याच खासदार हेमामालिनी यांनी सुद्धा म्हटले आहे की मी राहुल गांधी यांना असे काही करतांना संसदेत बघितले नाही. आता कुणावर विश्वास ठेवावा? लोकसभेतील विश्वासदर्शक ठरावा संदर्भात बोलतांना वडेट्टीवार म्हणाले की मणिपूर जळत असल्यापासून ‘मौनीबाबांनी’ मौन पाळले होते. त्यांचे मौन उघडावे म्हणून आणलेला हा विश्वासदर्शक ठराव आहे. आमच्याकडे आकडेवारी नाही, मात्र, ‘मौनीबाबांनी’ या प्रकरणी आपले तोंड उघडले पाहिजे.  मणिपुर पेटविण्याचा काम कुणी केलं? या मागे केंद्रातील मोदी सरकार आणि मणिपुर राज्यातील विरनसिंग यांची भाजपची सरकार जवाबदार असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.

हेही वाचा >>> नागपूर : मुलीची प्रकृती बिघडली…डॉक्टरने तपासले, म्हणाला, पोटात…..

पत्रकारांचा प्रश्न विधानसभेत मांडणार जळगाव येथील पत्रकारांवर हल्ला प्रकरणी बोलतांना ते म्हणाले की पत्रकारिता निर्भिडपणे व्हावी. या देशात विचार स्वातंत्र्य आहे. लेखन स्वातंत्र्य आहे. आणि एखादया पत्रकाराने जर सत्य बाजू मांडली तर त्या पद्धतीने त्याला धमकावणं आणि मारण्याचे काम होत असेल तर असे समजावे की या सरकारमधील आमदारांना सत्तेचा माज चढलेला आहे. सत्तेची मस्ती चढलेली आहे. या मस्तीतून हे पत्रकारांना सामान्य माणसांना मारत सुटले आहेत. जनतेनीही यांना आता जशाच तसा उत्तर देण्याची गरज आहे. तरच हे सुधारतील. हा प्रश्न मी विधानसभेत मांडणार असल्याची ग्वाही ही याप्रसंगी वडेट्टीवार यांनी दिली.

Story img Loader