नागपूर: आपले घर स्वच्छ आणि नीटनेटके असावे असे प्रत्येकालाच वाटते. प्रत्येक गृहिणीचे याकडे विशेष लक्ष असते. मात्र, घरात कितीही स्वच्छता ठेवली तरी घरात डास आणि झुरळ काही जायचे नाव घेत नाहीत. शिवाय झुरळे आणि डास नाहीत असे एकही घर शोधून सापडणे कठिण आहे.
झुरळे तर कधी कधी जेवण बनवताना एखाद्या पदार्थात पडतात आणि अन्न खराब करतात. अनेकांना तर झुरळांची खूप भिती वाटते तर काहींना त्यांचा किळस येतो. पण सर्वात मोठी अडचण ही आहे की, त्यांना मारण्यासाठी कितीही उपाय केले तरी ते पुन्हा ते आपणाला घरात दिसतात. जर तुम्हालाही अशाच समस्येचा सामना करावा लागत असेल तर आज आम्ही तुम्हाला त्यावर उपाय सांगणार आहोत.
हेही वाचा… रस्ते वाहतूकमंत्री गडकरी म्हणतात, “मै तो चला, जिधर चले रस्ता” वाचा सविस्तर…
कडूलिंबाचे झाड सगळीकडेच असते. त्याची ताजी पाने घ्या. ती उन्हामध्ये छान वाळवून घ्या. वाळलेल्या पानांची मिक्सरमधून भूरटी करा. यानंतर कांद्याची वरची वाळलेली सालपट आपणू फेकून देतो. मात्र, याचाही उपयोग यासाठी करता येणार आहे. कांद्याची सोकलेली सालपट, तेजपान,लवंग, कापूर यांचेही एक मिश्रण तयार करा. त्याची मिक्सरमधून भूरटी करता. कडूलिंबाची पाने आणि दुसरे मिश्रण एकत्र करून एका डब्यात भरून ठेवा. त्यानंतर एक दिवा घ्या. त्या दिव्यामध्ये तेल ओतून त्यात वात टाका. या दिव्यावर सुरुवातीला तयार करण्यात आलेले मिश्रण टाका. दिवा जळत असताना त्याच्या धुरापासून डास आणि झुरळ पळून जातात. शिवाय याचा सुगंध छान असतो व शरीरासाठी कुठलेही नुकसान करत नाही.
- साहित्य- एक दिवा, तेल, वात, कडूलिंबाची पाने, तेजपान, कापूर आणि लवंग