नागपूर: केंद्रीय निवडणूक आयोगाने ८५ वर्षांवरील नागरिक तसेच ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या मतदारांसाठी गृह मतदानाची सोय केली आहे. नागपूर जिल्ह्यात त्याला रविवारपासून सुरूवात झाली. नागपूर पूर्वमधील डायमंड नगरचे रहिवासी वसंत ढोमणे यांनी वरील पद्धतीने मतदानाचा हक्क बजावला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना व दिव्यांगांना मतदानाचा लाभ मिळावा व त्यांनाही मतदान करता यासाठी रविवारपासून चार दिवस नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघातील एकूण २ हजार ३६० मतदार गृहमतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक विभागातर्फे १६० चमू तयार करण्यात आल्या असून यात ४८० अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी १०५ टीम तयार करण्यात आल्या असून यात ३१५ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

हेही वाचा…‘हे’ प्रसिद्ध डॉक्टर व समाजसेवी काँग्रेसमध्ये? नेमके काय झाले, वाचा…

आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, पात्र असलेला एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करीत आहे. निवडणूक आयोगाने ८५ वर्षांवरील नागरिक आणि ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग मतदारांना गृहमतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे इच्छुक मतदारांकडून नमुना १२ – डी भरून घेण्यात आला आहे.

हेही वाचा…“निवडणुका असल्या तरी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही,” मुख्यमंत्र्यांची ग्वाही; म्हणाले..,

गृहमतदानाच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान मतदानाची व्हिडिओग्राफी करण्यात येणार असून दोन अधिकारी / कर्मचारी, मायक्रो निरीक्षक, व्हिडीओग्राफर, उमेदवारांचे मतदान प्रतिनिधी सोबत राहणार आहे. गृहमतदानाची पूर्वसूचना बीएलओमार्फत संबंधित नोंदणीकृत मतदारांना देण्यात येत आहे. कुठल्याही प्रकारे मतदाराच्या मतदानाच्या गोपनीयतेचा भंग होणार नाही, याची आत्यंतिक काळजी घेण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी यावेळी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Home voting facility initiated for elderly and disabled voters in nagpur district cwb 76 psg