नागपूर : मेयो रुग्णालय परिसरात बुधवारी सकाळी १० च्या सुमारास एका युवकाला महिला डॉक्टरच्या वेशात संशयास्पदरित्या फिरताना महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या (एमएसएफ) जवानांनी पकडले. या युवकाला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. प्राथमिक तपासात तो समलैंगिक असल्याचे कळते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बंटी (बदललेले नाव) असे युवकाचे नाव आहे. मेयो रुग्णालयातील प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, हा युवक बुधवारी सकाळी डॉक्टरांचा ॲप्राॅन आणि बुरखा घालून सर्जिकल काॅम्प्लेक्स परिसरात फिरत होता. वेगवेगळ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडे जाऊन रुग्णाला काय त्रास आहे, कुणाला दाखवायचे आहे, अशी विचारणा करत त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक गोळा करत होता.

हेही वाचा – पश्चिम विदर्भातील बाजारात तुरीचे भाव तेजीतच

दरम्यान, एमएसएफ जवानाचे त्याकडे लक्ष गेले. वागणूक संशयास्पद वाटल्याने त्यांनी त्याला थांबवले. विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळाली. जवानांनी त्याला पकडल्यावर तो पुरुष असल्याचे पुढे आले. त्यानंतर तातडीने पोलिसांना सूचना देण्यात आली. प्राथमिक तपासात हा तरुण समलैंगिक (गे) असल्याचे पुढे येत आहे. तो पुरुषांच्या आकर्षणामुळे महिलेच्या वेशात त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक गोळा करत होता.