नागपूर: अंबाझरी, बर्डी, धरमपेठ, सदर, फुटाळा, रविनगर आदी परीसरातील अनेक कॅफेच्या आड हुक्का पार्लर सुरु असून तरुण-तरुणींची मोठी गर्दी अशा कॅफेमध्ये वाढत आहे. अनेक कॅफे चालकांशी उपायुक्तांच्या विशेष पथक, गुन्हे शाखेचे पथक आणि पोलीस ठाण्यातील डीबी पथकाचे अर्थपूर्ण संबंध आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशाने धरमपेठमधील एका कॅफेच्या आड सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर छापा घातला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धरमपेठेत गोतमारे कॉम्प्लेक्स येथे क्युबा स्पोर्ट्स लॉंज ॲंड कॅफे असून तेथे हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती खबऱ्यांच्या माध्यमातून पोलिसांना मिळाली. पोलिसांनी रात्री आठ वाजताच्या सुमारास धाड टाकली असता तेथे काही ग्राहक हुक्का पिताना आढळून आले. पोलिसांनी कॅफेचा व्यवस्थापक तौहीद शेख बशीर शेख (२१, चंदननगर) याला ताब्यात घेतले व तेथून साहित्य जप्त केले.

हेही वाचा… गोंदिया: अंधारात उभ्या ट्रकला मागून आलेल्या भरधाव ट्रकची धडक; तिघांचा जागीच मृत्यू

बर्डी पोलीस ठाण्यात तौहीदसोबतच कॅफेचा मालक प्रफुल्ल अशोक चौधरी (३८, रामनगर) याच्याविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबाझरी, सीताबर्डी आणि सदर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी अनेक कॅफे संचालकांना हुक्का पार्लर चालविण्यासाठी आर्थिक संबंध ठेवले आहेत. सदरमधील कुणाल आणि एक कर्मचारी हुक्का पार्लर संचालकाकडून जोरदार वसुली करतात. त्यातच गुन्हे शाखेचे पथक आणि अंमली पदार्थ विरोधी पथकातील कर्मचाऱ्यांनीही चिरीमिरी घेत कारवाईपासून संरक्षण दिल्याची माहिती समोर आली आहे.

पोलीस उपायुक्तांच्या विशेष पथकानेसुद्धा छापा घालण्याचा धाक दाखवून कॅफे संचालकाकडून चिरीमिरी घेण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे आता हुक्का पार्लरची संख्या वाढत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hookah parlor under the name of cafe in nagpur large crowd of youngsters is increasing in such cafes adk 83 dvr
Show comments