अमरावती : जिल्ह्यातील बेनोडा (शहीद) येथील एका विहिरीतून गेल्या काही दिवसांपासून अतिशय गरम पाणी येत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी आश्चर्य व्यक्त करीत विहीर पाहण्यासाठी गर्दी केली आहे.
बेनोडा येथील रहिवासी हरिश्चंद्र संपतराव वाघ यांच्या घरात सुमारे पाच वर्षांपुर्वी खोदलेली विहीर आहे. या विहिरीतील पाण्याचे तापमान आजवर सामान्य होते. घरगुती वापरासाठी आणि पेयजल म्हणून या विहिरीतील पाण्याचा वापर केला जात होता. चार दिवसांपुर्वी या विहिरीतून अचानकपणे गरम पाणी येत असल्याचे वाघ कुटुंबीयांच्या लक्षात आले. विहिरीतील पाण्याचा उपसा करण्यासाठी मोटरपंप बसविण्यात आला आहे. सुरूवातीला पंपातून गरम पाणी आल्याने वाघ कुटुंबीयांनी बादलीच्या सहाय्याने विहिरीतील पाणी काढून पाहिले, ते देखील गरम होते. निसर्गाचा हा चमत्कार पाहण्यासाठी नागरिकांनी वाघ यांच्या घरी गर्दी केली आहे.
हेही वाचा >>> बुलढाणा: समृद्धी महामार्गावर टायर फुटल्याने भरधाव कार उलटली, तीन जखमी
घटनेची माहिती मिळताच बेनोडा येथील सरपंच, उपसरपंच यांनी पाहणी केली आणि या प्रकाराची माहिती महसूल प्रशासनाला दिली. त्यानंतर तहसीलदारांनी घटनास्थळी मंडळ अधिकारी आणि पटवारी यांना पाठवून पाण्याचे नमूने गोळा करण्यास सांगितले. हे नमूने भुगर्भशास्त्र विभागाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त होईपर्यंत विहिरीतील पाणी वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. भूगर्भातील जलप्रवाह दिशा बदलवित असताना ते गंधकाच्या साठ्याच्या संपर्कात आल्याने भूजलाचे तापमान वाढते, ही नैसर्गिक प्रक्रिया असल्याचे भूगर्भशास्त्र अभ्यासकांचे म्हणणे आहे.