नागपूर: हिवाळी अधिवेशन त्यापाठोपाठ आलेल्या नाताळाच्या सुट्या आणि नववर्षाचे स्वागत अशा तिहेरी योगामुळे हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये चैतन्याचे वारे वाहताहेत. या निमित्ताने मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होणार आहे.
गुरुवार, ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशामुळे शहरातील मोठ्या हॉटेलमधील खोल्या बूक आहेत. २० डिसेंबरपर्यंत अधिवेशन राहणार आहेत. त्यानुषंगाने मंत्री, आमदार, त्यांचे कार्यकर्ते यांचा फौजफाटा शहरात दाखल होत आहे. त्यांनी शहरातील हॉटेलातील खोल्या अॅडव्हान्समध्ये बुक केल्या आहेत.
हेही वाचा… १८०० अंगणवाड्या बंद, गोंदिया जिल्ह्यात चाललंय काय? वाचा सविस्तर…
सोबतीला याचकाळात लग्नाचा बहार आहे. परिणामतः हॉटेलमधील खोल्या, बँक्वेट, सेलिब्रेशन हॉल, लॉन, रिसॉर्ट यांचा व्यवसाय तेजीत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही नाताळाच्या सुट्यांपासून नववर्षाच्या स्वागतापर्यंत हॉटेल, रेस्टॉरंटमधील गर्दी शिगेला पोहोचणार आहे.
या माध्यमातून कोट्यवधीची उलाढाल हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्र अनुभवणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नाताळ आणि नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषान सज्ज करण्याचा ट्रेंड वाढला आहे. त्यानुसार, कुटुंबासाठी ओपन एअर रेस्टॉरंट, जोडपे, युवक-युवतीसाठी विविध हॉटेल्स आणि रेस्टॉरेटमध्ये व्यवस्था करण्यात येते. हॉटेल रॅडिसन ब्ल्यू, हॉटेल ले मेरिडिअन, हॉटेल प्राइड, सेंटर पॉइंट, टेन डाउन इन स्ट्रीट (टीडीएस), व्ही फाइव्ह, सातपुडा हिल्स रिसॉर्ट, चोखर धानी, हॉटेल तुली, या मोठ्या हॉटेल्समध्ये नववर्षांचे स्वागत करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
हेही वाचा… उपराजधानीत थंडी, पण राजकीय तापमान वाढले,उद्यापासून अधिवेशन
अनेक हॉटेलमध्ये नवीन वर्षांसाठी विशेष पॅकेज घोषित करण्यात आले असून त्याचे बुकिंग सुरू झाले आहे. अनेक नवीन हॉटेल्स नागपूरकरांची ‘टेस्ट ऑफ एन्जॉय’ पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
जोडप्यांसाठी विशेष कार्यक्रम
काही हॉटेल्समध्ये केवळ जोडप्यांसाठी कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्यामध्ये विशेष डीजेसह जेवण व ड्रिंकचा समावेश असणार आहे. त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढात होणार आहे. लग्नाचे मुहूर्त असल्याने हिवाळ्यातील लग्नांचा मौसम जोरात राहणार आहे. हॉटेलमधील बँक्वेट, सेलिब्रेशन हॉल, लॉन, मंगल कार्यालये बुक झाली आहे. त्या माध्यमातून वेडिंग इंडस्ट्री कोट्यवधींचे व्यवहार अनुभवणार आहे.