वर्धा: सध्या भाजपची संकल्प से समर्थन ही यात्रा सुरू आहे. खुद्द प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यात्रा नेतृत्व करीत बाजारपेठांचा धांडोळा घेत कामांबाबत विचारपूस करीत आहे.
वर्ध्यात ते आले मात्र अन् त्यांना महिलांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागले. त्यांनी एका गृहिणेस विचारले की पंतप्रधान नरेंद्र मोदीच हवेत न? त्यावर ती महिला भडकून म्हणाली की , कशाला पाहिजे मोदी. सगळी महागाई वाढवून ठेवली. त्यावर भाव आता कमी झाल्याचे म्हणताच महिला म्हणाली आता पुन्हा वाढवून ठेवले. विजेचे बिल भरायची सोय नाही.
हेही वाचा… मराठा आरक्षणासाठी अकोल्यात सलग सहा दिवस ‘अन्नत्याग’; अखेर उपोषण सोडताना म्हणाले, ‘आता…’
आम्ही काय माती खायची का, असे सवाल सुरू झाल्यावर बावनकुळे यांनी हातातील माईक खाली नेला. त्यावर परत, आता कसा माईक खाली करता, ऐकून घ्या न, असे प्रत्युत्तर सदर महिलेने देताच बावनकुळे यांनी काढता पाय घेतला. स्टेजवर या, बोलू असे सांगायला ते विसरले नाही. मात्र तोवर जी शोभा व्हायची ती पुरती होवून गेली होती.