नागपूर : म्हाडाच्या ५६ वसाहतीतील सहकारी गृहनिर्माण संस्थांकडील १९९८ ते २०२१ या कालावधीतील वाढीव सेवा शुल्क माफ करण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला आहे. यामुळे सुमारे ३८०.४० कोटी रुपयांचे वाढीव सेवा शुल्क माफ होणार असून मुंबईतील ५० हजार सदनिकाधारकांना दिलासा मिळाला असल्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले.

मुंबईतील म्हाडाच्या ५६ वसाहतीतील १९९८ पासून वाढीव सेवा शुल्काचे दर लागू करण्यात आले होते. परंतु त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. सेवा शुल्कामध्ये वाढ करण्यासंबंधी अभ्यासगटही नियुक्ती करण्यात आला होता.

Jewellery worth six and half lakhs was stolen from passenger at Swargate ST station
स्वारगेट एसटी स्थानकात चोरट्यांचा उच्छाद, प्रवासी तरुणाकडील साडेसहा लाखांचे दागिने चोरीला
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
nashik vidhan sabha
नाशिक: एकाच दिवसात ३४९ गुन्हेगार हद्दपार
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
Narendra Modi  statement on Ratan Tata as a leader and personality who cares for the weak
दुर्बलांची काळजी घेणारे नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व: रतन टाटा

हेही वाचा >>> अनुच्छेद ३७० बाबतचा निर्णय अस्वस्थ करणारा; माजी न्यायमूर्ती रोहिंटन नरिमन यांचे परखड भाष्य

या अभ्यासगटाने मुंबईतील म्हाडा वसाहतीतील रहिवाशांकडून जे सेवा शुल्क घेतले जाते, त्यातील म्हाडामार्फत पुरविल्या जाणाऱ्या सेवांच्या शुल्काचे दर ५० टक्क्यांनी कमी करण्यात यावेत, अशी शिफारस केली होती.

अमली पदार्थाविरोधात कारवाईसाठी कृती गटाची स्थापना – फडणवीस

नागपूर : अमली पदार्थाच्या विरोधात सरकारने व्यापक मोहीम सुरू केली असून आतापर्यंत केलेल्या विविध कारवाईत सुमारे ५० हजार कोटी रुपयांचे अमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच अमली पदार्थावरील कारवाईसाठी कृती गटाची स्थापना केल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली.

पेमेंट गेटवे कंपनीच्या १६ हजार कोटींच्या घोटाळय़ाची एसआयटी चौकशी नागपूर:  ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये असलेल्या सेफेक्स पे या पेमेंट गेट वे आणि पे आऊट सुविधा देणाऱ्या  कंपनीचे बँक खाते हॅक करून झालेल्या १६ हजार १८० कोटी रुपयांच्या व्यवहाराची विशेष तपास पथक (एसआयटी) मार्फत चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत दिले.  पेमेंट गेट वे आणि पे आऊट सुविधा देणाऱ्या सेफेक्स पे  कंपनीचे बँक खाते हॅक करून १६ हजार १८० कोटी रुपयांचा व्यवहार करण्यात आल्याचे उघडकीस आले असून या कंपनीचे २५ कोटी रुपये हडप करण्यात आले आहेत.