मंगेश राऊत
रहाटेनगर टोलीतील तरुणींचा पुढाकार
नागपूर : अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहाटेनगर टोली चोरी, अवैध दारू विक्री, जुगार आदी अवैध धद्यांसाठी गुन्हेगारीसाठीच ओळखली जाते. पण, या वस्तीतील तरुणींचा समूह आपल्या वस्तीची प्रतिमा बदलण्यासाठी प्रयत्न करीत असून त्यांनी एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने ‘मास्क’ तयार करण्याचा गृहउद्योग सुरू केला.
काही दिवसांपूर्वी अजनी पोलिसांनी रहाटेनगर टोलीत छापा टाकून अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईचा विरोध करीत रहाटेनगर टोलीतील पुरुष व महिलांनी पोलिसांवर दगडफेक केली. यामुळे वस्तीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यावेळी पोलिसांनी जवळपास ४०० पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावून १०० वर लोकांची धरपकड केली होती. या वस्तीत राहणाऱ्या महिला व पुरुष चोरी, अवैध दारू विक्री करण्याचे काम करतात. त्यांच्याविरुद्ध अनेक गुन्हेही दाखल आहेत. तसेच या भागातील लोकांना जुगार व मटका लावण्याचेही व्यसन आहे. मुलेही भीक मागण्याचे किंवा कचरा वेचण्याचे काम करतात. या भागातील मुलांच्या शिक्षणासाठी सेवा सर्वदा बहुउद्देशीय संस्थेद्वारा प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याशिवाय या परिसराची गुन्हेगारी वस्ती ही प्रतिमा पुसण्यासाठी या संस्थेचे संस्थापक खुशाल ढाक यांनी शहरातील काही प्रतिष्ठित लोकांच्या मदतीने येथील तरुणींना ‘मास्क’चा गृहउद्योग सुरू करण्यात मदत करीत आहेत. परिसरातील तरुणींनी आई-वडिलांनी गुन्हेगारीचा मार्ग सोडून काहीतरी काम करावे, यासाठी प्रयत्न करीत आहेत. सोबतच त्यांनी परिसरात ‘मास्क’ तयार करण्याचे काम सुरू केले आहे. तरुणींच्या या प्रयत्नांना यश मिळावे व वस्तीची प्रतिमा बदलावी, याकरिता समाजानेही पुढाकार घेऊन त्यांच्याकडून मास्कची खरेदी करावी. पोलीस विभागानेही वस्तीतील लोकांकडे केवळ गुन्हेगारांसारखे न बघता मुख्य प्रवाहात येण्यासाठी धडपड करणाऱ्या तरुणींकडून मास्कची खरेदी करून त्यांना मदत करावी. जेणेकरून रहाटेनगर टोली या गुन्हेगारी वस्तीची नवीन ओळख तयार होईल, असे आवाहन खुशाल ढाक यांनी केले आहे.
कांचनताई गडकरी, डॉ. प्रिया वंजारी यांचे सहकार्य
या वस्तीतील तरुणींच्या हाताला काम उपलब्ध व्हावे, याकरिता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचनताई गडकरी आणि संताजी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. प्रिया वंजारी यांच्याकडून सेवा सर्वदा बहुउद्देशीय संस्थेला सहकार्य करीत आहेत.