नागपूर : नागपुरात गेल्या दोन दिवसापासून पाऊस कोसळत आहे, ठिकठिकाणी पाणी साचले आहे. तरीही रेल्वे स्थानकावरील विद्युत देखभाल दुरुस्ती कक्षाला अचानक आग लागली आणि लाखो रुपयांचे नुकसान झाले. पण आगीचे नेमके कारण काय, हे समोर आलेले नाही.मध्यवर्ती नागपूर रेल्वेस्थानकावरील विद्युत विभागाच्या देखभाल-दुरुस्ती कक्षाला मंगळवारी सकाळी अचानक आग लागली. आगीचे नेमके कारण समजले नसून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. रेल्वे प्रशासनाने आगीच्या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>>यवतमाळच्या ३३ मंडळांत अतिवृष्टी; बेंबळा, अडाण, सायखेडा धरणातून विसर्ग, संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत

स्थानकावर ‘इटारसी एन्ड’ला देखभाल दुरुस्ती कक्ष आहे. येथे दिवस पाळीत काम चालते. या कक्षात रेल्वेडब्यात लागणारे पंखे, दिवे, वातानुकूलित उपकरण, कुलर, इनर्व्हटर, डिस्प्ले बोर्ड, कळ (बटन), सॉकेट व इतर साहित्य होते. यामध्ये काही नवीन साहित्य तसेच नादुरुस्त साहित्य असल्याचे समजते. ही आग सकाळी साडेनऊच्या सुमारास लागली. या आगीत किती नुकसान झाले हे चौकशीअंती कळू शकेल, असे रेल्वेच्या प्रशासनाने सांगितले.