लोकसत्ता टीम

नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री सध्या एकनाथ शिंदे आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात अजित पवार मुख्यमंत्री होतील की नाही हे मी कसे सांगू शकणार आहे. सध्या महायुतीचे सरकार असताना त्यात अजित पवार सध्याच्या गणितात मुख्यमंत्री कसे होऊ शकतात. जो पर्यंत तिघांचे गणित जुळत नाही तो पर्यंत त्यावर बोलणे योग्य नाही असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

जयंत पाटील नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी विमानतळावर बोलत होते. आमदार अमोल मिटकरी यांनी राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार होतील असे मत व्यक्त केले असले तरी त्यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे त्यावर काही बोलायचे, मला वाटत नाही मात्र सध्या भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांचे सध्याचे गणित कसे जुळेल हे सांगता येत नाही तो पर्यंत त्यावर बोलणे योग्य नाही असेही पाटील म्हणाले.

आणखी वाचा-नागपूर : “बॅनरबाजी करून अन् सवाजीची पार्टी देऊन निवडणूक जिंकता येत नाही,” नितीन गडकरी यांचं विधान; म्हणाले…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही काम असतील त्यामुळे सर्व कुटुंब घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले त्यामुळे यावरुन अजित पवार मुख्यमंत्री होतील अशी चर्चा करणे योग्य नाही असेही पाटील म्हणाले.

ईशार्ळवाडी येथील घटनेपूर्वी तेथील नागरिकांनी आम्हाला इथून हलवा असे सांगितले होते अश्या पद्धतीने दगड पडून नुकसान होण्यापूर्वी सरकारने अगोदर उपाययोजना करायला पहिजे होत्या मात्र त्या करण्यात आल्या नाही आणि ही घटना घडली आहे. मात्र तिथे आज सरकारी योजना पोहोचत नाही. सरकार कुठेतरी यामध्ये कमी पडत आहे सरकारने त्वरित आवश्यक ती सर्व मदत करणे आवश्यक आहे असेही पाटील म्हणाले.

आणखी वाचा- अप्‍पर वर्धा धरण तुडूंब, पण शहानूर अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत… कारण काय, जाणून घ्या

अर्थमंत्री म्हणून अजित पवार सर्वाना समान न्याय देतील अशी अपेक्षा आहे..मागेल त्याला ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी निधी मिळू शकतो. विशेषत: लोकप्रतिनिधींना त्यांच्या मतदारसंघासाठी निधी मिळाला आनंद होतो. विरोधी पक्ष नेता हा त्या सभागृह सर्वाधिक संख्या असणाऱ्या पक्षाला ठरवायचा असतो त्या संदर्भात लवकरच या आठवड्यात काँग्रेस निर्णय घेतील अशी शक्यता आहे.