नागपूर: केंद्रातील मोदी सरकारने संसदेचे पाच दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात मोदी सरकार ‘इंडिया’ हा शब्द संविधानातून हटवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावरूनच आता आपल्या देशाला भारत नाव कसे पडले. त्याचे ‘इंडिया’ नाव कसे झाले. याचा हा इतिहास.
आपल्या देशाला ‘भारत’ असे म्हणतो. हे नाव ‘भरत’ राजावरून पडले आहे, भरत हा राजा दुष्यंत आणि शकुंतला यांचा सुपुत्र- याचा उल्लेख महाभारताच्या आदी पर्वात आला आहे. महाकवी कालिदासाचे शाकुंतल हे नाटक याच भरताच्या जन्म कहाणीवर आधारित आहे. राजा भरताचे मूळ नाव ‘सर्वदमन’ असे असून, महाभारतानेच त्याचे नाव भरत (तेजपुंज वा प्रभा असणारा, अंधाराचा विनाश करणारा, विद्यावान इ.) असे ठेवले. हा भरत राजा कुरु आणि पंडू वंशाचा पूर्वज आहे. म्हणूनच व्यासांनी या वंशांच्या इतिहासावर आधारित महाकाव्याला नाव दिले ‘महाभारत’. थोडक्यात ‘भारत’ हे संस्कृत नाव आहे. भा म्हणजे ‘ज्ञान’ वा ‘प्रकाश’ किंवा ज्ञानाचा/विद्येचा प्रकाश आणि रत म्हणजे पसरवणारा/वाहून घेतलेला- म्हणजेच भारत. म्हणजे ‘ज्ञान प्रकाशाने अंधाराचा विनाश करणारा. इतरही अनेक भारतीय भाषांनी आणि आपल्या सन्माननीय संविधानानेसुद्धा ‘भारत’ हे नाव स्वीकारले आहे.
हेही वाचा – गोंदिया : भरधाव ट्रॅव्हल्सच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू; देवरी तहसील कार्यालयासमोरील घटना
असे पडले ‘इंडिया’ नाव
इंग्रज भारतात आल्यानंतर त्यांनी इंडस व्हॅली, अर्थात सिंधू खोरे या नावावरूनच भारताचे नाव ‘इंडिया’ असे ठेवले. याचे कारण त्यांना देशाचे नाव भारत किंवा हिंदुस्थान असे म्हणणे गैरसोयीचे होते.