नागपूर : मध्य रेल्वेने दोन मालवाहू रेल्वेगाड्या एकत्र जोडून मालवाहतूक करण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. चालू आर्थिक वर्षातील पाच महिन्यांत अशा ५७ गाड्यांनी मालवाहतूक केली आहे. या प्रयोगामुळे मालवाहतूक जलदगतीने शक्य झाली असून दोन मालगाड्या एकत्र धावल्याने इतर गाड्यांना रेल्वेमार्ग उपलब्ध होत आहे.

मध्य रेल्वे सध्या नागपूर विभागातील अजनी यार्ड आणि भुसावळ यार्ड येथून लांब पल्ल्याच्या मालवाहू गाड्या चालवल्या जातात तसेच अधिक लांबीच्या मालवाहू गाड्यांसाठी अधिक ‘लूप लाईन’ तयार करून माल उतरवणे आणि चढवण्यासाठी सुविधा वाढवल्या जात आहेत. ३० ते ३१ ऑगस्ट २०२३ या दरम्यान मूर्तिजापूर येथे ‘लूप लाईन’चे बांधकाम पूर्ण केले आहे आणि नांदगाव (मनमाडजवळ), माहेजी (जळगावजवळ) आणि बोरगाव (अकोलाजवळ) येथे आणखी तीन लांब पल्ल्याच्या मालवाहतूक ‘लूप लाईन’ तयार करण्याचे काम सुरू आहे.

silver truck mankhurd
मुंबई: मानखुर्द येथे चांदीचा ट्रक अडवला, ८० कोटींची आठ हजार ४७६ किलो वजनाची चांदी जप्त
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Toyota has launched the special edition versions For year end
Toyota Year End Deals : टोयोटाच्या तीन गाड्यांचे लिमिटेड एडिशन लाँच; कारच्या खरेदीवर मिळणार भरपूर अ‍ॅक्सेसरीज
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
New Maruti Suzuki Dzire cheapest model price its features Engine and design
New Maruti Suzuki Dzire: मारुतीच्या नवीन डिझायरला मोठी पसंती, सगळ्यात स्वस्त मॉडेल घेण्यासाठी ग्राहकांची लागली रांग
Vidarbha Marathwada passengers facing problem due to no train between Nagpur to Sambhajinagar
नागपूर संभाजीनगरला जोडणारी एकही रेल्वेगाडी का नाही
traffic congestion, Parking problem APMC navi mumbai double parking, trucks
एपीएमसीतील पार्किंग समस्या जटिल, ट्रकच्या दुहेरी पार्किंगमुळे वाहतूक कोंडी

हेही वाचा – कर्मचारी नव्हे साक्षात ‘देवदूत’च! सतर्कतेमुळे टळले मोठे रेल्वे अपघात; ‘महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्कारा’ने सन्मान

एका मालगाडीला सुमारे ५० वॅगन असतात. दोन मालवाहू रेल्वेगाड्या एकत्र जोडून म्हणजे १०० वॅगनची मालगाडी नागपूर आणि भुसावळ विभागात सुरू करण्यात आल्याने मालवाहतूक अधिक गतिमान झाली. दोन लांब मालगाड्या धावत असताना किमान दोन गाड्यांमध्ये दोन किलो मीटर किंवा एक सेक्शनचे अंतर ठेवावे लागते. दोन मालगाड्या जोडल्याने हे अंतर ठेवण्याची गरज नाही. त्यामुळे या मार्गावर आणखी एक मालगाडी किंवा प्रवासी गाडी चालवण्यासाठी मार्ग उपलब्ध होत आहे. शिवाय माल उतरवणे, चढवणे सुलभ होते आणि वेळेचीही बचत होते.

हेही वाचा – अकोल्यात ‘लम्पी’चा प्रादुर्भाव वाढला; आणखी चार जनावरांना लागण

आणखी मालवाहू गाड्या चालवण्यात येणार

मध्य रेल्वेने २७ ऑगस्ट २३ पर्यंत ५७ अधिक लांबीच्या मालवाहू गाड्या चालवल्या आहेत. यामध्ये नागपूर विभागातून ३४ आणि भुसावळ विभागातून २३ जास्त लांबीच्या गाड्यांचा समावेश आहे. असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवराज मानसपुरे म्हणाले.