वर्धा: जिल्ह्यातील आदर्श शाळा राज्यात आदर्श ठरण्याचा संकल्प शिक्षकांनी केला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत राज्य शासनाने राज्यात ४८८ शाळा आदर्श शाळा म्हणून घोषित केल्या. त्यात वर्धा जिल्ह्यातील आठ शाळा आहेत. या शाळा आदर्श ठराव्या यासाठी राज्यस्तरीय यंत्रणा निगराणी ठेवणार आहे. या शाळांमध्ये विविध पैलूने कार्य सुरू झाले आहे. खान अकादमी अंतर्गत गणित विषयाचे प्रबोधन सुरू झाले आहे. तसेच शाळेत गुणवत्ता विकास आराखडा तयार करण्यात आला असून त्याची अमलबजावणी सुरू झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आदर्श शाळा योजनेत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत मुख्याध्यापक चालू असलेल्या कामकाजाबाबत सादरीकरण करतात. त्यानंतर आठही शाळांचे मुख्याध्यापक संपर्क अधिकाऱ्याशी चर्चा करून पुढील नियोजन करतात. पर्यवेक्षीय यंत्रणा वारंवार भेटी देत मार्गदर्शन करतात. केवळ गुणवत्तापूर्णच नव्हे तर भौतिक सुविधांनी परिपूर्ण होण्यासाठी शिक्षण संचालकांमार्फत अनुदान प्राप्त झाल्याने त्या सुसज्ज झाल्या आहे. काही शाळांना मोठ्या बांधकामांसाठी निधी मिळणार आहे.

हेही वाचा… खुशखबर! राज्यातील “या” अधिकाऱ्यांना IAS दर्जा बहाल

लोकांच्या मनातील आदर्श शाळा निर्माण होण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, गावकरी यांचा समन्वय महत्त्वपूर्ण ठरणार. डायटचे प्राचार्य डॉ.मंगेश घोगरे, शिक्षणाधिकारी संजय मेहेर, योजनेच्या जिल्हा नियंत्रक डॉ.अर्पणा शंखदरवार हे आदर्श शाळा योजनेचे मुख्य मार्गदर्शक आहे. जिल्ह्यातील आदर्श शाळा योजनेत जिल्हा परिषदेच्या आंजी, चानकी कोपरा, अडेगाव, मंगरूळ, थार, नांदगाव, रसुलाबाद व सावली खुर्द येथील शाळांचा समावेश आहे. जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे म्हणतात की मुलांच्या आवडीनिवडी लक्षात घेवून कलागुण विकसीत करणे व त्यांची विविध विषयात रूची निर्माण करण्याचे मुख्य सूत्र आदर्श शाळा योजनेत आहे. या आठही शाळा इतरांसाठी प्रेरणादायी ठरतील.