नागपूर : जगभरात स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग म्हणजे सर्व्हिकल कॅन्सर आढळून आला आहे. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे दरवर्षी तीन लाखांपेक्षा जास्त महिलांचा मृत्यू होतो. सर्व्हिकल कॅन्सर सारखे भयावह आजार महिलांना, मुलींना होऊ नये ते या त्रासातून जाऊ नये याकरिता सर्व्हिक्स ही लस देण्यात येते.

गर्भाशय आणि योनीमार्गाला जोडणारा भाग म्हणजे सर्व्हिक्स किंवा ग्रीवा. हा भाग गर्भाशयाच्या खालच्या बाजूस योनीमार्गात उघडतो. स्त्रीयांना याच ठिकाणी गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होतो. महिला, मुलींमध्ये ब्रेस्ट कॅन्सर नंतर आता सर्व्हिकल कॅन्सर हा मोठ्या प्रमाणात महिलांमध्ये आढळून आला आहे.

महापालिका व इंडियन कॅन्सर सोसायटी नागपूरच्या विद्यमाने महापालिका डीप्टी सिग्नल समाज भवन परिसरात महापालिका संजय नगर हिंदी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थीनींकरिता गर्भाशय मुख कर्करोग प्रतिबंधात्मक मोफत लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते.

मुलींचे आरोग्य भविष्यात सुदृढ राहावे व त्यांना कॅन्सर सारखे आजार होऊ नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सर्वाव्हॅक लस देण्यात येते. याच अंतर्गत मनपा व इंडियन कॅन्सर सोसायटी नागपूरच्या संयुक्त विद्यमाने डीप्टी सिग्नल समाज भवन परिसरात ९ ते १४ वयोगटातील मुली/महिलांना गर्भाशयाच्या कर्करोगापासून बचाव करणारी लस (सर्व्हिक्स लसीकरण) लकडगंज झोन येथील मनपा संजय नगर हिंदी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थीनींना देण्यात आली. यावेळी २२५ विद्यार्थीनींना सर्व्हिक्स ही लस देण्यात आली. या लसीचा दुसरा बुस्टर डोज २५ ऑगस्टला देण्यात येणार आहे.
यावेळी महाापालिका अतिरिक्त आयुक्त आंचल सूद गोयल यांनी उपस्थितांना लसीकरणाचे महत्व समजावून सांगितले. भविष्यात महिलांना होणारे आजार या लसीकरणामुळे कसे टाळता येतील तसेच त्यांचे आयुष्य कसे सुदृढ होईल याविषयी त्यांनी माहिती दिली. सर्व्हिक्स ही लस सुरक्षित आहे. येणाऱ्या काळात इतर शाळेमध्ये देखील या लसीकरणाचे कार्यक्रम नक्की घेऊ असे त्या म्हणाल्या.

ब्रेस्ट कॅन्सर नंतर सर्व्हिक्स हा जास्ती प्रमाणात महिलांमध्ये पहिला जाते. सर्व्हायकल कॅन्सर सारखे भयावह आजार महिलांना, मुलींना होऊ नये ते या त्रासातून जाऊ नये याकरिता सर्व्हिक्स ही लस देण्यात येते. महापालिका घेण्यात आलेला लसीकरणाचा कार्यक्रम खरंच प्रशंसनीय आहे. सर्व्हिक्स ही लस घेणे सुरक्षित आहे तसेच याचे सकारात्मक परिणाम शरीरावर होतील. तसेच यामुळे महिला, मुलींचे आयुष्य स्वस्थ राहील असे महापालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर म्हणाले.

Story img Loader