अकोला : महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेअंतर्गत वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत केवळ ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय उपलब्ध करून दिला. हा पर्याय निवडणाऱ्या अकोला परिमंडळाअंतर्गत अकोला, बुलढाणा आणि वाशीम जिल्ह्यातील पर्यावरणस्नेही १३ हजार ५३९ ग्राहकांकडून १६ लाख २४ हजार ६८० रुपयांची वार्षिक बचत सुरू आहे.

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेनुसार वीज ग्राहकांनी छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात १० रुपये सवलत देण्यात येते. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीजबिलांमध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत होते.

Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
High Severity Alert For Apple Users
High Severity Alert For Apple Users : ॲपल युजर्सना मोठा धोका? लीक होऊ शकतात पर्सनल डिटेल्स; तुमचा फोन ‘या’ यादीत आहे का तपासा
mpcb issues notice to hinjewadi it park over functioning of common sewage treatment plan
हिंजवडी आयटी पार्कला जलप्रदूषणासाठी नोटीस; सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ठपका
The employees deployed on election duty should be given leave on the day after the election Demand of the Municipal Union Mumbai news
निवडणूक कर्तव्यार्थ तैनात कर्मचाऱ्यांना निवडणुकीनंतरच्या दिवशी सुटी द्यावी
RBI announces changes to KYC rules! How it will impact you
KYC : RBI ने केली KYC नियम बदलण्याची घोषणा, आपल्यावर नेमका कसा परिणाम होणार?

हेही वाचा – वर्धा : नाराज काँग्रेस जिल्हाध्यक्षांची संमेलनास दांडी, म्हणतात तब्येत बिघडली…

वीजबिल तयार झाल्यानंतर लगेचच संगणकीय प्रणालीद्वारे ते ‘गो-ग्रीन’मधील ग्राहकांना ‘ई-मेल’द्वारे पाठविण्यात येत आहेत. सोबतच ‘एसएमएस’द्वारेदेखील वीजबिलाची माहिती दिली जाते. त्यामुळे ग्राहकांना ‘प्रॉम्प्ट पेमेंट’चा लाभ घेणे अधिक शक्य झाले. ‘गो-ग्रीन’ योजना ही काळाची गरज आहे. वीजग्राहकांनी या योजनेत सहभागी व्हावे व पर्यावरण रक्षणात योगदान द्यावे, असे आवाहन अकोला परिमंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा – नजर हटता हटेना! ..आणि ४५ वर्षांची ‘वनबाला’ नटूनथटून धावू लागली

बुलढाणा जिल्ह्यातून सर्वाधिक सहभाग

अकोला परिमंडळाअंतर्गत अकोला जिल्ह्यात पाच हजार १४५ ग्राहक ‘गो-ग्रीन’ योजनेत सहभागी झाले आहेत. बुलढाणा जिल्ह्यात सहा हजार ०३८ ग्राहक, तसेच वाशीम जिल्ह्यातील दोन हजार ३५६ ग्राहकांनी ‘गो-ग्रीन’मध्ये सहभाग घेतला आहे.