नागपूर: नवीन वर्ष २०२५ सुरू व्हायला अवघे दोन दिवस उरले आहेत. नवीन वर्षात अनेक मोठ्या ग्रहांचा राशी बदल होत आहे, ज्याचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर होईल. त्यामुळे अनेक राशींसाठी नवीन वर्ष महत्त्वाचे आणि खास ठरणार आहे. नवीन वर्ष २०२५ तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसे असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? विवाह मुहूर्त आणि बरेच काही समजून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या वर्षात केवळ एक अंगारकी संकष्टीचतुर्थी, तीन गुरुपुष्यामृत योग आणि चार ग्रहणे येणार असल्याची माहिती, आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल नागेश वैद्य यांनी दिली. ग्रहांच्या एकूणच स्थितीबद्दल बोलताना डॉ. वैद्य म्हणाले, सध्या रवी-चंद्र धनू राशीत असून, मंगळ कर्क राशीत आहे. तर शनी कुंभ राशीतून आणि गुरू वृषभ राशीतून भ्रमण करणार आहे. तसेच शनी २९ मार्च रोजी मीन राशीत प्रवेश करेल. त्यामुळे मकर राशीची साडेसाती संपुष्टात येऊन मेष राशीला सुरू होईल. त्यामुळे २९ मार्चनंतर कुंभ, मीन आणि मेष राशींना शनीची साडेसाती राहील. शिवाय २९ मे रोजी राहू आणि केतू कुंभ आणि सिंह राशीत प्रवेश करतील.

हेही वाचा – ३ जानेवारीला पृथ्वी ते सूर्याचे अंतर राहणार सर्वांत कमी !

या वर्षात व्रतबंधाचे (मुंजींचे) केवळ २२ मुहूर्त असून, जुलै ते डिसेंबरमध्ये मुहूर्त नाहीत. तर विवाहासाठी ५६ मुहूर्त आहेत. या वर्षाचे वैशिष्ट्य म्हणजे बारापैकी चार महिन्यांमध्ये प्रत्येकी पाच शनिवार आणि पाच रविवार आले आहेत. हा एक दुर्मिळ योग समजला जातो.

२०२५ या वर्षात फक्त एकच अंगारकी संकष्टी चतुर्थी असून, ती १२ ऑगस्ट रोजी आहे. आणि पितृपक्ष पंधरवडा फक्त चौदा दिवसाचा असून तो ८ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर असा आहे. शिवाय २४ जुलै, २१ ऑगस्ट आणि १८ सप्टेंबर रोजी तीन गुरुपुष्यामृत योग आहेत.

हेही वाचा – मजुरांच्या माध्यमातून २ हजारांच्या नोटा बदलवण्याचे रॅकेट, ‘दिल्ली ‘कनेक्शन’

चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणही

याशिवाय नववर्षात दोन खग्रास चंद्रग्रहण आणि तेवढेच खंडग्रास सूर्यग्रहणही आहेत. यातील फक्त ७-८ सप्टेंबर रोजी कुंभ राशीतून होणारे खग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे. तसेच १४ रोजी येणारे खग्रास चंद्रग्रहण कन्या व तूळ राशीतून होणार असून, २९ रोजीचे खंडग्रास सूर्यग्रहण राशीचक्रातील शेवटची रास मीनमधून होणार आहे. यावर्षी १४ जानेवारी रोजी मकरसंक्रांती आली आहे. दर बारा वर्षांनी भरणारा कुंभमेळा यावेळी मकरसंक्रांतीपासूनच प्रयागराज येथे प्रारंभ होत आहे. हा कुंभमेळा १४ जानेवारीपासून सुरू होणार आहे. नवरात्र मात्र अकरा दिवसांचा राहणार आहे. दीपावलीपर्व सात दिवसांचे असणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How will your horoscope be in the new year know marriage timings and more from international astrologer dag 87 ssb