बुलढाणा :  इयत्ता बारावीचा आजचा पेपर फुटल्याचे खळबळजनक वृत्त आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील एका केंद्रावर हा घोळ झाला असून शिक्षण विभागाचे अधिकारी तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात दाखल झाल्याचे सूत्रांनी सांगितले. सिंदखेड राजा तालुक्यातील एका केंद्रावरून गणिताचा पेपर  सुरु होण्यापूर्वी अर्धा तास आधीच ‘बाहेर’ आला. याची माहिती मिळताच शिक्षण विभागासह जिल्हा प्रशासन हादरले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता बुलढाणा येथील माध्यमिक शिक्षण विभागाचे अधिकारी पोलिसात रीतसर तक्रार देण्यासाठी सिंदखेड राजा तालुक्यात दाखल झाले. विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना ही माहिती नाव उघड न करण्याचा अटीवर दिली. सिंदखेडराजा व साखर खेर्डा पोलीस ठाण्यात स्वतंत्र तक्रार देण्यात येणार असल्याचे या सूत्रांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा