नागपूर : हल्ली नागपूरसह राज्यातील बऱ्याच भागांत उकाडा वाढला असून वीज वापर वाढले आहे. वीज देयक जास्त आल्याने हे देयक बरोबर की अवास्तव हे आपण आपल्या घरात असणारी उपकरणे, त्याचा असलेला वॅट व संख्या आणि उपकरणाचा दिवसातील वापराचे तास ही माहिती टाकून आपल्याला कळू शकते.
उकाडा वाढल्याने सहाजिकच पंखा, रेफ्रीजरेटर, एअर कंडिशनर यांचा वापरही वाढत आहे. या उपकरणांच्या वीजवापराच्या प्रमाणातच आपल्याला वीजबिल आले की नाही ही शंका उपस्थित होते. यात विजेचा वापर कमी व आवश्यक असेल तेवढाच केल्यास वीजबिलात बचत होणे शक्य आहे. प्रत्येक घरी रोज नवनवीन विद्युत उपकरणांची भर पडत आहे. ही उपकरणे वाढली व त्याचा वापर वाढला की, विजेचे बिलही वाढणार आहे. मात्र आपल्या हातात मे, जून व जुलै महिन्याचे वीज देयक आले की, अनेकांच्या भुवया उंचावतात. माझा वापर एवढा नसताना बिल भरमसाठ आल्याचे त्यांना वाटत असते.
हेही वाचा – वृत्तपत्र व्यवसायातील कष्टकऱ्यांसाठी कल्याणकारी मंडळ का नाही? विक्रेता संघटनेचा सवाल
एखाद्या प्रकरणात कर्मचाऱ्याच्या दोषामुळे, चुकीच्या मीटर वाचनामुळे किवा मीटरमधील तांत्रिक दोषामुळे हे होऊ शकते. त्यासाठी आपण आपल्या घरामध्ये, दुकान व इतर ठिकाणी असलेली विजेची उपकरणे त्याचा वॅट व त्याचा दैनंदिन वापर याची जर माहिती करून घेतली व अभ्यास केला तर आपल्यालाही सत्यता पडताळता येईल.
हेही वाचा – भंडारा : बंद घरात महिलेचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला
वीज देयकाच्या मागे असलेल्या वर्गवारीनिहाय वीज देयकाचे प्रति युनिट दर दिलेले असतात त्यामध्ये ० ते १००, १०१ ते ३०० व ३०१ ते ५०० व ५०१ ते १००० व १००१ आणि अधिक युनिट वीजवापरासंदर्भातील दर छापलेले असतात. त्यामुळे एखाद्या महिन्यात जास्त वीज युनिट वापरल्यास त्याचे दरही त्या तुलनेत वाढत असतात. घरात विजेचा वापर करताना आयएसआय प्रमाणित तारांचा तसेच ऊर्जा बचतीचे प्रमाणपत्र लाभलेल्या व स्टार लेबल असलेल्या उपकरणांचा वापर करावा, जेवढे जास्त स्टार तेवढी जास्त ऊर्जा बचत होते. १००० वॅटच्या उपकरणाचा जर एक तास वापर केला तर १ युनिट साधारणत: वीज खर्च होते, त्यामुळे एकूण विजेचे वॅट व १ युनिट विजेसाठी लागणारा वेळ यासंदभार्तील तक्ता सोबत दिला आहे.
वीज वापराबाबतचा तक्ता
प्रकार वीज वापर (वॅट्स) एक युनिट विजेसाठी लागणारा वेळ
बल्ब २४/४०/६०/१०० ४०/२५/१६/१० तास
पंखा- ३६ इंच ६० १६ तास ४० मिनीट
पंखा- ४२ इंची ८० १२ तास ३० मिनीट
टेबल फॅन ४० २५ तास
मिक्सर, ज्युसर ४५० २ तास १३ मिनीट
इलेक्ट्रीक ओव्हन १२०० ५० मिनीट
इस्त्री – कमी वजन १००० ६० मिनीट
इस्त्री जास्त वजन २००० ३० मिनिट
टीव्ही १५ ६६ तास ४० मिनिट
वॉशिंग मशीन स्वयंचलित २००० ३० मिनीट
सेमी स्वयंचलित ४०० २ तास ३० मिनीट
व्हॅक्यूम क्लिनर ९५० १ तास
संगणक २५० ४ तास
वॉटर प्युरिफायर २५ ४० दिवस