नागपूर : केंद्र सरकारने सोन्याच्या दागिने विक्रीत पारदर्शकतेसाठी हाॅलमार्क कायदा केला आहे. त्यातील सुधारणेनुसार १ एप्रिलपासून सोन्याच्या दागिन्यांवर चारऐवजी तीन चिन्ह असलेले एचयूआयडी हाॅलमार्क सक्तीचे केले गेले आहे. त्यामुळे आता जुने हाॅलमार्क असलेले दागिने विकता येणार नाही.

सोन्याचे दागिने खरेदी करताना ग्राहकांचे रक्षण व्हावे आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दागिने खरेदीवरचा त्यांचा विश्वास वाढवा, यासाठी केंद्राने सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंगसाठी २००० मध्ये योजना सुरू केली. १६ जून २०२१ पासून देशातील ७४१ जिल्ह्यांपैकी २६८ जिल्ह्यात हॉलमार्किंग सेंटर उभारून हॉलमार्किंग प्रमाणित दागिने विक्री सुरू झाली.

Gold and silver prices fell, Lakshmi Pujan, Gold price,
लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्याच दिवशी सोने-चांदीचे दर घसरले; असे आहेत आजचे दर
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Should buy gold or diamond jewellery on Diwali
Money Mantra : दिवाळीत सोन्याचे की हिऱ्याचे दागिने घ्यावेत?
How many options are there to buy gold or jewellery for Diwali
Money Mantra : दिवाळीसाठी सोने वा दागिने घेण्याचे किती पर्याय आहेत?
silver sales increase in 2024
सोन्यापेक्षा चांदीची मागणी का वाढली? सोन्याच्या विक्रीत घट होण्याची कारणं काय?
Gold Price Today Gold In Mumbai Check Latest Gold And Silver Prices On 1 November 2024 mumbai pune nagpur gold price silver price on 1 November 2024 google trends
Gold Price: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोन्याचे भाव कमी झाले का? गुगलवरही ट्रेंड होणारा सोन्याचा आजचा भाव पाहा
Maid in police custody in case of jewelery theft Mumbai news
दागिन्यांच्या चोरी प्रकरणी मोलकरीण पोलिसांच्या ताब्यात
Changes in gold price on Dhantrayodashi day nagpur
धनत्रयोदशीच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठे बदल; उच्चांकी दरामुळे..

हेही वाचा – अमरावती: मेळघाटात वादळी पावसाने नुकसान

आता यामध्ये सोन्याच्या दागिन्यावर एचयूआयडी क्रमांकही अनिवार्य केल्याने सराफांना १ एप्रिलपासून पूर्वीच्या चार चिन्ह असलेल्या हाॅलमार्कच्या दागिन्यांऐवजी तीन चिन्ह असलेल्या एचयूआयडी क्रमांक असलेला हाॅलमार्क घेऊनच दागिने विक्री करता येईल. दरम्यान ४० लाखांहून जास्त दागिन्यांची वार्षिक विक्री करणाऱ्या व हाॅलमार्क सक्ती केलेल्या जिल्ह्यांतच हे नियम लागू होणार आहेत. नागपूरचाही त्यात समावेश असल्याची माहिती भारतीय मानक ब्युरोच्या (बीआयएस) नागपूर विभागाचे मुख्य संचालक हेमंत आडे यांनी शुक्रवारी बीआयएस कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. बीआयएसचे वैज्ञानिक सर्वेश त्रिवेदी म्हणाले, नागपूर जिल्ह्यात दागिन्यांना हाॅलमार्क करणारे ८ केंद्र असून बीआयएसकडे ७७८ सराफांची नोंदणी आहे. ही संख्या आणखी वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.

हेही वाचा – राज्यातील नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसाठी स्थळ निश्चित, जाणून घ्या सविस्तर..

…तर पाचपट दंड

सराफांकडे उपलब्ध असणारे हॉलमार्क दागिने विक्रीसाठी सरकारने ३१ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ दिली होती. ही मुदत संपली आहे. त्यामुळे आता हॉलमार्कबरोबरच सोन्याच्या दागिन्यांवर एचयूआयडी क्रमांक अनिवार्य झाला आहे. या क्रमांकाविना सराफाने दागिने विक्री केल्यास संबंधिताला १ लाख रुपये वा दागिण्याच्या पाचपट किमतीचे दंड व कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.

चौकट…

नि:शुल्क नोंदणीची सोय

“सराफांना बीएसआयची नोंदणी ऑनलाइन नि:शुल्क उपलब्ध आहे. पूर्वी त्यासाठी सुमारे १० हजार रुपये खर्च येत होता. त्यामुळे सराफांनी नोंदणीकरून सहकार्य करावे.” असे भारतीय मानक ब्युरोच्या नागपूर विभागाचे मुख्य संचालक हेमंत बी. आडे म्हणाले.