नागपूर : नागपूर येथील एका मेंदूमृत रुग्णाचे जिवंत हृदय प्रत्यारोपणासाठी पुणे येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ थोरॅसिक सायन्सेसमध्ये बुधवारी सकाळी नेण्यात आले. नागपूर ते पुणे दरम्यान कमीत कमी वेळेमध्ये हे हृदय पोहोचवण्यासाठी हवाई दलाच्या एएन-३२ या विमानाचा वापर करण्यात आला. यावेळेत या मार्गावर ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता.
आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ थोरॅसिक सायन्सेसमध्ये उपचार घेणाऱ्या व्यक्तीमध्ये नागपुरातून जिवंत हृदय नेण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. यासाठी नागरी प्रशासनाने विनाअडथळा आणि अतिशय वेगाने ग्रीन कॉरिडॉर तयार केले, असे सरंक्षण दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.