लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर: उपराजधानीत यकृत प्रत्यारोपणाची संख्या वाढत आहे. या शस्त्रक्रियेचा नागपुरात शुभारंभ करणाऱ्या न्यू ईरा रुग्णालयात बुधवारी शंभरावे यकृत प्रत्यारोपण झाले. त्यामुळे मध्य भारतात एकाच रुग्णालयात शंभर यकृत प्रत्यारोपण होण्याचा हा नवीन विक्रम नोंदवला गेला आहे.

उपराजधानीत २०१८ पूर्वी यकृत प्रत्यारोपण होत नव्हते. न्यू इरा रुग्णालयाचे संचालक डॉ. आनंद संचेती, डॉ. नीलेश अग्रवाल आणि इतरांनी एकत्र येत मध्य भारतात यकृत प्रत्यारोपण सुरू करण्याचा निश्चय केला. त्यांना २०१८ मध्येच यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. राहुल सक्सेना यांची त्यांना साथ मिळाली. त्यामुळे २२ मार्च २०१८ मध्ये नागपुरात मेंदूमृत रुग्णाकडून मिळालेल्या अवयवातून पहिले यकृत प्रत्यारोपण यशस्वी झाले.

आणखी वाचा-अमरावती : धावत्‍या बसमध्‍ये काळाने गाठले! तिकीट काढतानाच महिला…

दरम्यान २०१८ मध्ये येथे जिवंत दात्याच्या दानातून दुसरे यकृत प्रत्यारोपण झाले. त्यानंतर २०१९ मध्ये येथे पहिले बालरोग यकृत प्रत्यारोपण झाले. २०२० नंतर नागपुरात हळू- हळू यकृत प्रत्यारोपण केंद्र वाढले. त्यामुळे यकृत प्रत्यारोपणाची संख्याही वाढली. नुकतेच न्यु इरा रुग्णालयात एक यशस्वी यकृत प्रत्यारोपण झाल्याने येथील एकूण यकृत प्रत्यारोपणाची संख्या आता १०० वर पोहचली आहे. मध्य भारतात एवढे यकृत प्रत्यारोपण होण्याचा हा विक्रम आहे. न्यू इरा रुग्णालयातील यकृत प्रत्यारोपण चमूत डॉ. राहुल सक्सेना, डॉ. शशांक वंजारी, डॉ. सागर चोपरे, डॉ. साहिल बन्सल, डॉ. निमिषा मृणाल, डॉ. नितीन देवते, डॉ. अमन झुल्लुरवार, डॉ. जितेश आत्राम, डॉ. अश्विनी तायडे, डॉ. संदीप धूत, डॉ. पंकज, डॉ. पूजा जाधव यांचा समावेश आहे.

यकृत प्रत्यारोपणाच्या यशाचा दर ८५ टक्के

न्यू इरा रुग्णालयात यकृत प्रत्यारोपणाच्या यशाचा दर ८५ टक्के आहे. मागील दोन वर्षांची आकडेवारी बघितल्यास तो ९० टक्के आहे. नागपुरात यकृत प्रत्यारोपण वाढल्याने आता रुग्णांना मोठ्या शहरात या उपचारासाठी जाण्याची गरज नसल्याने उपचाराचा खर्चही कमी झाला आहे.” -डॉ. आनंद संचेती, संचालक , न्यू इरा रुग्णालय, नागपूर.

आणखी वाचा-बंगला सज्ज,विरोधी पक्ष नेत्याबाबत अनिश्चितता

“सर्वत्र यकृत सिरोसिसचे रुग्ण वाढत आहे. या रुग्णांसह अत्यवस्थ रुग्णांसाठी नागपुरात सोयी वाढल्याने यकृत प्रत्यारोपण वाढले. न्यू इरा रुग्णालयात या सर्व अद्यावत सोयी असल्याने १०० यकृत प्रत्यारोपण शक्य झाले.” -डॉ. राहूल सक्सेना, यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ.

यकृताचा काही भाग काढून प्रत्यारोपण

“ जिवंत व्यक्तीलाही आपल्या शरिरातील यकृताचा थोडा भाग देऊन दाण करता येते. यकृत प्रत्यारोपण ही किचकट प्रक्रिया आहे. न्यू इरा रुग्णालय एका महिन्यात अशा सुमारे पाच शस्त्रक्रिया करण्यास सक्षम आहे.” -निलेश अग्रवाल, संचालक, न्यू इरा रुग्णालय.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hundred liver transplants at new era hospital in nagpur mnb 82 mrj