लोकसत्ता टीम
बुलढाणा : प्रस्तावित सिंदखेड राजा शेगाव ‘भक्तिमार्ग’ रद्द करण्याच्या मागणीसाठी आज गुरुवारी चिखलीनजीक महामार्गविरोधी कृती समितीच्यावतीने ‘रास्ता रोको’ करण्यात आला. यादरम्यान नागपूर-पुणे महामार्ग आणि जालना-मलकापूर राज्य मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली. परिणामी दोन्ही बाजुंनी वाहनाच्या दीर्घ रांगा लागल्याने शेकडो प्रवासी आणि मालवाहू चालकांची प्रचंड गैरसोय झाली.
हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग पासून सिंदखेडराजा ते शेगाव दरम्यान १०९ किलोमीटरचा आणि सहा हजार कोटी रुपये खर्चाचा हा महामार्ग आहे. कोणत्याही नेत्याची आणि जनतेची मागणी नसताना हा मार्ग शासनाने प्रस्तावित केला आहे.याला प्रारंभीपासून विरोध होत असून माजी जिल्हा परिषद सदस्या ज्योती खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली होळीच्या दिवशी शासन निर्णयाची जाहीर होळी करण्यात आली. अलीकडे घंटानाद आंदोलन करण्यात आले. यापाठोपाठ काँग्रेस ने देखील महामार्गाच्या विरोधात उडी घेतली. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोन्द्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा काँग्रेसने बुलढाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २ जुलै रोजी आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले.
आणखी वाचा-अमरावती : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेवरून पुन्हा मतभेद, विधानसभेत…
शेतकऱ्यांचा लक्षणीय सहभाग
त्या आंदोलनात बोलताना राहुल बोन्द्रे यांनी ४ जुलै च्या रास्ता रोकोची घोषणा केली होती. त्यानुसार आज नागपूर पुणे राज्य महामार्गावर चिखली नजीकच्या खामगाव चौफुली येथे रास्ता रोको करण्यात आले. माजी आमदार राहुल बोन्द्रे आणि भक्ती महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात अंढेरा , सेवानगर, अंतरी खेडेकर, गागंगलगाव, एकलारा, पांढरदेव, करतवाडी, घानमोड, मानमोड, अंबाशी, टाकरखेड, उदयनगर, कवठल, अमडापुर, किन्ही महादेव, शिराळा, तित्रव, आदी गावातील शेतकरी, ग्रामस्थ बहुसंख्येने सहभागी झाले. तसेच महामार्ग बाधीत शेतकऱ्याच्या सोबत सामाजिक कार्यकर्ते व कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) स्वाभिमानी शेतकरी संघटना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
आम्ही कायम शेतकऱ्याच्या सोबत राहू त्यासाठी वेळ प्रसंगी सरकारने आमच्या वर गुन्हे दाखल केले तरी ते सहन करू असे सर्वपक्षीय नेत्यानी सांगितले. यावेळी डॉ.सत्येंद्र भुसारी, विनायक सरनाईक, डॉ.ज्योती खेडेकर, गणेश बरबडे, श्रीकिसन धोंडगे, अशोक पडघान, संतोष वानखेडे, विष्णु पाटील कुळसुंदर, दिपक म्हस्के, श्रीराम झोरे, निलेश अंजनकर, विजया खडसन, संजय गवई, दासा पाटील, कपील खेडेकर, रामभाउ जाधव, नारायण देशमुख, प्रदिप भवर, शिवनारायण म्हस्के, या राजकीय मंडळीसह शेतकरी समाधान म्हस्के, बंडु जाधव, गणेश म्हस्के, सोहम खेडेकर, विजय वाघ, विठोबा मुंडे, नितीन म्हस्के, शिवा म्हस्के, मुरलीधर सपकाळ, जगदेव म्हळसणे, राजु म्हस्के, अशोक अंभोरे, हर्षल म्हस्के, बबन आंभोरे, भारत म्हस्के, रामभाउ म्हस्के, अच्युत म्हस्के, राजेंद्र म्हस्के, मदन म्हस्के, पांडुरंग म्हस्के, तुळषिराम डिगोळे, अंबादास वाघमारे, राहुल ठोंबरे, ऋषी वाघमारे, राजेंद्र मोरे, माधव तोरमळे, विश्वभर जाधव, मधुकर वाघ, समाधान खेन्ते, मधुकर ढवळे, विठोबा ढवळे, परमेश्वर म्हळसणे, चेतन म्हस्के, भारत म्हस्के, मनोज जाधव, विठल शेळके, सतिष उगले, राम आंभोरे, मंगेशमोरे, श्रीकांत म्हस्के, माधुरी म्हस्के, वंदना सपकाळ, मंदा म्हळसने, सिंधूताई सपकाळ, कला सपकाळ, कैलास ढोबरे, मधुकर ढोंबरे, गोपाल मरकड, रंजित करंडे, वनीता म्हस्के, स्वाती म्हस्के, सुलाम्हस्के, राजाराम ढोंबरे, रामदास ढोंबरे, दिपक ठोबरे, करण ठोंबरे, गजान म्हस्के, यांच्यासह शेकडो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले.
महामार्गाचा अट्टाहास का?
दरम्यान यावेळी बोलताना काँग्रेस जिल्हाध्यक्ष बोन्द्रे यांनी सरकारच्या उरफाट्या निर्णय आणि मनमानी विरुद्ध टीकेची झोड उठविली. नेते आणि ग्रामस्थ यापैकी कुणाचीच मागणी नसताना देखील या मार्गाचा अट्टाहास का? हा सवाल आहे. सिंदखेडराजा ते शेगाव दरम्यान अगोदरच तीन मार्ग असताना भक्ती मार्गाचा प्रस्ताव रेटने चुकीचे आहे. चार तालुक्यातील हजारो एकर सुपिक आणि लाखमोलाची शेतजमीन जाणार आहे. यामुळे हजारो शेतकरी बाधित होणार असून किमान तीस टक्के शेतकरी भूमिहीन होणार आहे. यामुळे या मार्गाचा प्रस्तावच रद्द करावा अशी मागणी बोन्द्रे यांनी केली.
या वाहनांना ‘सूट’
सिंदखेड राजा ते शेगांव हा प्रस्तावीत भक्ती मार्ग रद्द व्हावा म्हणुन गेल्या काही दिवसा पासुन कृती समितीच्या माध्यमातुन विविध आंदोलनातून विरोध होत आहे. याचाच एक भाग म्हणुन आज चिखली खामगांव चौफुलीवर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पुणे नागपुर, तसेच मलकापुर सोलापुर, बुलडाणा जालना या मार्गावरील वाहतुक ठप्प झाली. मात्र आंदोलनकर्त्यांनी रूग्णवाहीका, शाळकरी मुलांची वाहने, विविध परिक्षांकरीता राज्य परिवहन महामंडळाच्या बस मधुन प्रवास करणा-या परिक्षार्थींच्या वाहनांना वाट मोकळी करून दिली.