बुलढाणा : राज्यातील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्तीची आश्वासने दिली, मात्र सत्तेत येऊन सहा महिने झाल्यावरही त्याची अंमलबजावणी न करता आमची राजरोस फसवणूक केली. यामुळे लाखो शेतकऱ्यांचा विश्वासघात कारणाऱ्या महायुती सरकारविरुद्ध फसवणूकीचे गुन्हे दाखल करा, अशी रोखठोक मागणी करीत शेकडो शेतकऱ्यांनी आज अंढेरा पोलीस ठाण्याच्या परिसरात ठिय्या आंदोलन सुरु केले.

शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्षाच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांसह शेतकरी या अजब गजब आंदोलनात आक्रमक पणे सहभागी झाल्याने पोलीस अधिकारी, कर्मचारी थक्क झाले. याची माहिती कळताच जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग देखील चक्रवून गेल्याचे घटनास्थळीचे विचित्र चित्र आहे. यामुळे पोलीस ठाणे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. आज शुक्रवारी, ४ एप्रिल रोजी दुपार पासून सुरु झालेले संतप्त शेतकऱ्यांचा हा ठिय्या संध्यकाळी देखील कायम आहे.

शेतकऱ्यांची घोर फसवणूक करणाऱ्या राज्यातील महायुती सरकार विरुद्ध फसवणूक केल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्याची रोखठोक मागणी आंदोलक शेकडो शेतकऱ्यांनी ठाणेदार याच्याकडे केली. तशी रीतसर लेखी तक्रार देखील दिली आहे. मागणीची पूर्तता होई पर्यंत ठिय्या कायम राहील असा निर्धार त्यांनी बोलून दाखविला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा पोलीस स्टेशन मध्ये शेकडो शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे सरकारवर फसवणूक सह शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा, अशी मागणी या शेतकऱ्यांची आहे.

काय आहे तक्रार?

विधानसभा निवडणुकी दरम्यान महायुतीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना सर सकट कर्जमुक्तचे आश्वाशन दिले. भाषणातून नारा देत घोषणा केली होती. त्यामुळे त्यांना आम्ही शेतकऱ्यांनी मतदान करून निवडून दिले आहे. . मात्र आता सत्ता हातात मिळाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंतत्रि अजित पवारांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकत नाही, असे म्हटले आणि कर्ज भरायला सांगितले आहे . सत्तेत येऊन सहा महिने झाले, पण अंमलबजानी होत नाही.

गुन्हा दाखल करा अन्यथा

त्यामुळे राज्यातील शेतकरी आक्रमक झाला असून बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा पोलीस स्टेशनमध्ये शेकडे शेतकरी जमले. या शेतकऱ्यांनि सरकार वर गुन्हा दाखल करणेसाठी तक्रार दिली आणि त्याच ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केलेय … जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही, तोपर्यंत उठणार नाही ,अशी भूमिका त्यांनी घेतली. समाधान कणखर, तेजराव मुंडे, नामदेव जाधव, आत्मराम गाडे, समाधान घुबे, एकनाथ थुट्टे, नंदकिशोर भगत, राजू थुट्टे, दिनकर घुबे, विलास मुजमुल, विलास शेटे, राजेश्वर खरात, प्रकाश अंभोरे, समाधान कणखर, प्रकाश घुबे आदि शेकडो शेतकऱ्यानी ही तक्रार दिली आहे.